Author: Office Krushi Marathi

Maharashtra Rain

Maharashtra Rain : एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता मे महिना देखील अवकाळी पाऊस चांगलाच गाजवणार असे चित्र दिसू लागले आहे. कारण की पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तर काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी गारपीट झाली होती. अशातच आता आगामी पाच दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती कायम राहणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी दुष्काळात 13 वा महिना…

Read More
Kanda Niryat

Kanda Niryat : केंद्रातील सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या गडबडीत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील सरकारने घाईघाईत कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र सरकारने डिसेंबर 2023 मध्ये निर्यात बंदी लागू केली होती. मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी कायम राहणार होती. मात्र मध्यंतरी सरकारने मार्च 2024 नंतरही निर्यात बंदी सुरूच राहणार अशा आशयाचे शासन परिपत्रक काढले. यामुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली. निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नव्हता. परिणामी सरसकट निर्यात खुली झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या काळात निर्यात बंदीचा मुद्दा मोठा गाजला.…

Read More
Soybean Farming

Soybean Farming : पिवळं सोनं अर्थातच सोयाबीनची लागवड राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. याला शेतकरी बांधव गेलो गोल्ड अर्थातच पिवळं सोनं म्हणून ओळखतात. याचे कारण म्हणजे या पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन तर मिळतेच शिवाय बाजारात तेलबिया पीक असल्याने चांगला भावही मिळतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून बाजारभाव आणि उत्पादन खर्च याचे तारतम्य काही लागत नाहीये. कारण की, गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला समाधानकारक असा भाव मिळत नाहीये. या चालू हंगामातही अनेक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात आपल्या मालाची विक्री करावी लागली आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले असून कैक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आलेला नाहीये. तथापि, यावर्षी…

Read More

Solar Panel : नुकत्याच काही आठवड्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लाँच केली आहे. खरेतर, या योजनेची घोषणा 22 मार्च 2024 ला अर्थातच अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त या योजनेची घोषणा केली होती. त्यावेळी या योजनेला पंतप्रधान महोदय यांनी पीएम सूर्योदय योजना असे नाव दिले होते. मात्र, नंतर या योजनेचे नामकरण पीएम सूर्य घर मोफत योजना असे करण्यात आले. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. याची अंमलबजावणी देखील संपूर्ण देशभरात सुरू आहे. लोक मोठ्या प्रमाणात या योजनेत रजिस्ट्रेशन करत आहेत. या योजनेत नोंदणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या योजनेला…

Read More

Success Story : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या आव्हानांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट अशा वेगवेगळ्या संकटांमुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. यामुळे अनेक नवयुवक शेतकरीपुत्र आता शेती ऐवजी इतर उद्योगधंद्यांमध्ये उतरू लागले आहेत. घरची शेती असतानाही आता शेतकरी पुत्र नोकरी करण्याला अधिक महत्व दाखवत आहेत. मात्र जर योग्य पद्धतीने शेतीमध्ये नियोजन केले गेले तर शेतकरी हा नोकरदारापेक्षा जास्तीची कमाई करू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील म्हाकवे या गावातील एका युवा शेतकऱ्याने हीच गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. सतीश शिवाजी पाटील यांनी उसाच्या शेतीतून एकरी 120 टनाचा उतारा मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष…

Read More

Maharashtra Tukade Bandi Kayda : तुम्हीही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहात का किंवा शेतकरी कुटुंबातून येतात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा लागू आहे. म्हणजेच शेतजमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. सध्या लागू असलेल्या तुकडेबंदी कायद्यानुसार महाराष्ट्रात दहा गुंठ्यापेक्षा कमी बागायती जमीन अन 20 गुंठ्यापेक्षा कमी कोरडवाहू जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही. तुकडेबंदी कायद्यात घालून दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी जमिनीची जर खरेदी करायची असेल तर यासाठी प्रांत अधिकारीची परवानगी घ्यावी लागते. पण यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांना शेत रस्ता,…

Read More

Nagpur Goa Expressway : राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाचे 701 किलोमीटर लांबीपैकी 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धीचा नागपूर ते इगतपुरी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. उर्वरित इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील जुलै 2024 अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी सुरवात केली आहे. या महामार्गासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील पूर्ण झाली आहे. यामुळे या महामार्गाचे भू संपादनाचे काम सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध सुरू केला आहे.…

Read More

Weather Update : गेल्या वर्षी नैऋत्य मानसूनवर एलनिनोचा प्रभाव होता. यामुळे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यात तर परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. राज्यातील बहुतांशी भागात आता पाण्याचे संकट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी धरणांनी तळ गाठला आहे. धरणे कोरडी होऊ लागली आहेत. तसेच यंदाचा उन्हाळा हा अधिक तापदायक राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा राहणार ? गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी दुष्काळ पडणार का ? येत्या मान्सूनवर एलनिनोच सावट राहणार का ? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. दरम्यान याच संदर्भात काही जागतिक हवामान संस्थानांनी अंदाज व्यक्त केले…

Read More
Weight Loss Tips

Weight Loss Tips :- धावपळीचे दैनंदिन आयुष्य, प्रचंड प्रमाणात असलेला ताणतणाव, वेळेवर जेवण नसणे व संतुलित आहाराची कमतरता, बाहेर असताना कायम जंक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींमुळे वाढत्या वजनाची समस्या कित्येक लोकांना त्रस्त करत असून या वाढत्या वजनामुळे प्रचंड प्रमाणात पोट वाढल्याच्या देखील समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेच्या उपाययोजना करताना आपल्याला बरेच जण दिसून येतात. तरीदेखील जास्त फरक पडताना आपल्याला दिसून येत नाही. बरेचजण जिम तसेच डायट प्लान सारख्या उपाययोजनांपासून तर प्रचंड प्रमाणात महागडे उपचार देखील करतात. परंतु तरी देखील सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. परंतु जर ताबडतोब भोजन कमी करायचे असेल तर…

Read More
Electricity Saving Tips

Electricity Saving Tips :- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू झाला असून सगळीकडे अंगाची लाही लाही करणारा उकाडा मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागला आहे. त्यामुळे आता प्रत्येक घरामध्ये या उन्हापासून आणि त्या माध्यमातून होणाऱ्या उकाड्यापासून वाचण्याकरिता मोठ्या प्रमाणावर कुलर तसेच एयर कंडीशनर म्हणजेच एसीचा वापर केला जातो. काही काही घरांमध्ये तर अगदी 24 तास एसी सुरू असतो. कारण उन्हाळ्यामध्ये अंगाला गारवा खूप छान वाटतो. परंतु एसीच्या या भरमसाठ वापरामुळे महिन्याकाठी येणारे वीजबिल मात्र प्रचंड येते व आपल्या खिशाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्टिकोनातून झटका बसतो. कारण या कालावधीमध्ये एसीच नाहीतर त्यासोबत घरातील कुलर व फ्रिज चा वापर देखील प्रचंड वाढतो. त्यामुळे विज बिल देखील…

Read More