Indian Railway Facts :- भारतीय रेल्वे विभाग किंवा भारतीय रेल्वे ही जगाचा विचार केला तर सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था असून सगळ्यात जास्त कर्मचारी असलेला रेल्वे विभाग आहे. भारताचे उत्तरेकडील टोक जम्मू ते दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी पर्यंत रेल्वेचे जाळे असून पूर्व ते पश्चिम पर्यंत देखील रेल्वेचे जाळे भारतामध्ये विकसित करण्यात आलेले आहे. भल्या मोठ्या या रेल्वेचे नियोजन करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाचे अनेक उपविभाग करण्यात आलेले आहेत. त्यातीलच मध्य रेल्वे हा विभाग खूप महत्त्वाचा आहे याच मध्य रेल्वे विभागांमध्ये असे एक रेल्वे आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे त्याचे अंतर फक्त तीन किलोमीटरचे आहे. त्या ठिकाणी लोक ट्रेनने प्रवास करतात व हे अंतर…
Author: Krushi Marathi
भारतामध्ये अनेक मोठमोठे एक्सप्रेसवे असून सध्या भारतमाला परियोजनाअंतर्गत देखील अनेक मोठमोठी एक्सप्रेसवे यांचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या बांधण्यात येत असलेल्या एक्सप्रेस वे वर अनेक ठिकाणी मोठमोठे पूल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक किलोमीटर लांबीची बोगद्यांची निर्मिती देखील करण्यात येत आहे. असे एक्सप्रेसवे उभारताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचे पुलांची आणि रस्त्यांची उभारणी या माध्यमातून करण्यात येत आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण भारतातील सर्वात लांब पूलाचा विचार केला तर तो आसाम राज्यातील दिब्रुगड या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला आहे व या पुलाचे नाव आहे बोगीबिल पूल होय. या पूलामुळे अप्पर आसाम आणि…
Panjabrao Dakh: पंजाबरावांचा आनंददायी असा हवामान अंदाज! या जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार पाऊस, महत्त्वाचा अंदाज संपूर्ण राज्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड दिला व त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. परंतु त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात झाल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये पावसाने चांगल्या पद्धतीने हजेरी लावली व परत पावसाने खंड दिल्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. जर पावसाळ्याची सुरुवात आणि आतापर्यंतचा कालावधी पाहिला तर जवळपास तीन ते साडेतीन महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून खरिपाच्या पिकांसाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. तसे पाहायला गेले तर गेल्या दोन ते चार…
Pune Ring Road News : पुणे शहराभोवती करण्यात येणाऱ्या रिंगरोडसाठीच्या पश्चिम भागातील भूसंपादनाला गती मिळाली असून आतापर्यंत सुमारे १२ हजार १६६ शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास संमती दिली आहे. तर संपादित झालेल्या ८५ हेक्टर जमिनीच्या मोबदल्यापोटी सुमारे ४९१ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. महिनाअखेरीस आणखी एक हजार कोटींचा मोबदला भूसंपादनासाठी देण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. मावळ, मुळशी, हवेली आणि भोर तालुक्यांतील एकूण ३५ गावांतील भूसंपादनासाठी २ हजार ४५५ गटांतील जमीन आवश्यक आहे. चार तालुक्यांतील १६ हजार ९४० शेतकऱ्यांकडे ७३८.६४ हेक्टर एवढी जमीन आहे. यापैकी १ हजार ७७५ गटांतील शेतकऱ्यांपैकी १२ हजार १६६ शेतकऱ्यांनी गेल्या २१ दिवसांत ४९१.७४२ हेक्टर क्षेत्र देण्यास…
Onion Market News :- सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार सातत्याने मोठे निर्णय घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त दरात टोमॅटो उपलब्ध करून दिला जात आहे. आता सरकार स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देणार आहे. याअंतर्गत लोकांना 25 रुपये किलो दराने कांदा मिळणार आहे. केंद्र सरकारने 3 लाख मेट्रिक टनांचे प्रारंभिक खरेदीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर यावर्षी कांद्याचा बफर स्टॉक 5 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवला आहे. सोमवारपासून (21 ऑगस्ट) किरकोळ ग्राहकांना 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने कांदा उपलब्ध करून दिला जाईल. टोमॅटोपाठोपाठ कांद्याच्या वाढत्या महागाईने लोकांचे देशांतर्गत बजेट बिघडले आहे. टोमॅटोचे भाव उतरले असले तरी आता कांद्याचे वाढते दर यामुळे लोकांची चिंता…
नाफेडने खरेदी केलेला तीन लाख मेट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात विकण्यासह नेपाळचा कांदा आयात करण्याच्या निर्णयानंतर आता कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे अघोषित निर्यातबंदी होणार असून, किरकोळ बाजारात कांदा स्वस्त होणार असला, तरी दुसरीकडे कांदा उत्पादकांना याचा फटका बसणार आहे. परदेशी बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांची पतही घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गत पंधरवड्यात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्यास २५०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणला त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव झपाट्याने उतरू लागले. सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्यास प्रतिक्विंटल २००० ते २२०० रुपये…
Pune Farmer Success Story :- पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील रावडी गावामधील वर्षा विश्वास जोशी आणि विश्वास हरी जोशी या उभयतांनी आपल्या मेहनत, चिकाटी, जिद्दीच्या जोरावर ‘कोरोना संकटाकडे आपत्ती म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहिले. मागील पन्नास-पंचावन्न वर्षे उराशी बाळगलेलं स्वप्न साकारत घरगुती देशी गुलाबापासून जोशी फूडूस नावाने गुलकंदनिर्मिती उद्योग सुरू केला. जोशी यांची आई गुलाबापासून भावंडांसाठी पाट्या-वरवंट्यावर वाटलेला गुलकंद बनवत असे. उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आई दुधातून खायला गुलकंद देत असे. हा गुलकंद बनविण्याची कृती मनात घर करून बसली होती, ती पत्नीच्या साथीने कोरोना काळात उपयोगी पडून कुटीर उद्योगाचे उगमस्थान ठरले. पुण्याच्या आयुर्वेद रसशाळेतही जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडून…
Vande Bharat Express : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस बाबत फारच चर्चा रंगत आहेत. ही गाडी खरतर चार वर्षांपूर्वी सुरू झाली. मात्र या चार वर्षाच्या काळातच या गाडीची लोकप्रियता राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत खूपच अधिक भासत आहे. रेल्वे प्रवासी शताब्दी आणि राजधानीपेक्षा वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास अधिक सुरक्षित, गतिमान असल्याचा आणि आरामदायी असल्याच मत व्यक्त करत आहेत. हेच कारण आहे की रेल्वे प्रवाशांची पसंती पाहता आता देशातील विविध मार्गावर ही गाडी चालवण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. आतापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष बाब अशी की, यातील पाच मार्ग हे…
जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडे जमीन मोजणीला आलेल्या शेकडो अर्जाचा ढीग लागायचा. कमी मनुष्यबळामुळे प्रलंबित अजांची संख्या वाढतच होती. आता ‘रोव्हर’ या उपकरणामुळे कमी वेळेत आणि अचूक जमीन मोजणी होत असल्यामुळे शेतकरी, नागरिकांचा वेळ वाचत आहे. मोजणीसाठी अतितातडीचे शुल्क भरले तरी दोन महिने लागायचे, साधे शुल्क भरले तर तीन महिने लागायचे. आता साधे शुल्क भरणाऱ्याला एक ते दीड, तर अतितातडीच्या मोजणीसाठी एक महिना लागत आहे. काय आहे रोव्हर? रोव्हरचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. रोव्हर हा एक मुव्हिंग ऑजेट आहे, जो मोजणीच्या ठिकाणी घेऊन जाणे शक्य आहे. याचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे कुठूनही रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शविते. रोव्हर…
पुणे रिंगरोडसाठी संमतीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्याला जमीन मालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १२५ एकरांचा ताबा घेण्यात आला असून, २५० कोटींचा मोबदला वाटप करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली. हा प्रकल्प राज्यासाठीही महत्त्वाचा आहे. भूसंपादनसाठी जमीन मालकांसोबत संवाद सुरू आहे.. जमीनधारकांना २५ टक्के अधिक मोबदला दिला आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीच्या बैठकीत संमतीचा विकल्प सादर करणे व करारनाम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत दिल्याचेही त्यांनी सांगितले. २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकाच्यांनी भूसंपादन प्रक्रियेचा आज आढावा घेतला. संमतीने निवाडा करण्याच्या विकल्पास भूधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, जमीन ताब्यात देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास अवधी लागत असल्याने संमतीचा…