Pune Land Records : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आंनदाची बातमी ! अचूक अन् झटपट जमिनीची मोजणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्ह्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडे जमीन मोजणीला आलेल्या शेकडो अर्जाचा ढीग लागायचा. कमी मनुष्यबळामुळे प्रलंबित अजांची संख्या वाढतच होती. आता ‘रोव्हर’ या उपकरणामुळे कमी वेळेत आणि अचूक जमीन मोजणी होत असल्यामुळे शेतकरी, नागरिकांचा वेळ वाचत आहे.

मोजणीसाठी अतितातडीचे शुल्क भरले तरी दोन महिने लागायचे, साधे शुल्क भरले तर तीन महिने लागायचे. आता साधे शुल्क भरणाऱ्याला एक ते दीड, तर अतितातडीच्या मोजणीसाठी एक महिना लागत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काय आहे रोव्हर?
रोव्हरचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. रोव्हर हा एक मुव्हिंग ऑजेट आहे, जो मोजणीच्या ठिकाणी घेऊन जाणे शक्य आहे. याचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे कुठूनही रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शविते. रोव्हर घेऊन शेतात मोजणीसाठी जाता येईल, असे ते साधन आहे.

अचूक आणि झटपट मोजणी
रोव्हरद्वारे एक हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ ३० मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे. अचूक आणि झटपट मोजणी या यंत्राद्वारे होत असल्यामुळे शेतकयांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे

तीन महिन्यांत १६ हजार प्रकरणे निकाली
जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी रोव्हरच्या साहाय्याने जमीनमोजणीचे काम सुरू झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत सुमारे १६ हजार ४२२ प्रकरणे निकाली काढली आहेत.

अर्ज केल्यावर तीन महिने लागायचे : रोव्हरपूर्वी जमीन मोजणी करण्यासाठी तीन महिने लागायचे. आता महिन्याभरात मोजणी होऊन शेतकयांच्या हाती नकाशा पडणे शक्य झाले आहे. तातडीचे शुल्क भरूनदेखील शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे.

जिल्ह्यात १०० भूकरमापक
जिल्ह्यात १३ भूमी अभिलेख कार्यालय आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ११८ भूकरमापक पदांची मजुरी असून, सध्या १०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात सर्वाधिक २६ भूकरमापक हवेली तालुक्यात आहेत, तर मुळशी तालुक्यात १३ कर्मचारी आहेत.

रोव्हरद्वारे होणारी मोजणी करताना मानवी हस्तक्षेप राहत नाही.
त्यामुळे अचूक मोजणी होते. भविष्यात पुन्हा मोजणी करायची असल्यास अक्षांश व रेखांशांच्या आधारे कमी वेळेत मोजणी पूर्ण होते. शेजाऱ्याने मोजणी केल्यास त्यात आलेल्या अडचणी सोडविता येतात.
• सूर्यकांत मोरे, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, पुणे

तालुका निकाली प्रकरणे

आंबेगाव ७७७
बारामती ९३१
भोर ६९३
दौंड ७२५
जुन्नर १११६
खेड १६०६
मुळशी २११५
मावळ १३४७
पुरंदर ९४७
वेल्हा ३३८
इंदापूर ५८५
हवेली ३८३९
शिरूर १४०३
एकूण १६४२२