Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले, दरम्यान मतदानानंतर आज राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांदा बाजार भावात सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज राज्यातील तब्बल तीन बाजारांमध्ये कांद्याला कमाल 6500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. सरासरी बाजार भाव देखील मोठ्या प्रमाणात सुधारले असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. दुसरीकडे बाजारातील अभ्यासकांनी आगामी काही आठवडे कांदा बाजारात अशीच तेजी राहील असा अंदाज यावेळी वर्तवला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला सर्वोच्च भाव महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजच सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 6500 प्रतिक्विंटलचा…
Author: Krushi Marathi
Ladki Bahin Yojana News : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली असून या अंतर्गत आत्तापर्यंत पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच या योजनेच्या एका पात्र महिलेला आत्तापर्यंत 7500 रुपयांचा लाभ मिळाला आहे. काल विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या आहेत आणि येत्या 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान या निकालाच्या आधीच लाडक्या बहिणींसाठी…
Mumbai Local News : मुंबईमधील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानीत प्रवासासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात लोकलचा वापर करतात. यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. पण लोकल गाड्यांमध्ये होणारी गर्दी ही सर्वसामान्य प्रवाशांची चिंता वाढवते. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे अपघात होण्याची देखील भीती असते. अशातच मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेला नुकतीच एक सामान्य लोकल मिळाली आहे आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन…
Soybean And Cotton Farmer : गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य शासनाने पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे अनुदान दोन हेक्टर च्या मर्यादित दिले गेले. अर्थातच एका शेतकऱ्याला कमाल दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या अनुदानामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या आणि सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनुदानाची मागणी करण्यात आली होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील बहुतांशी कापूस…
Havaman Andaj : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागातील किमान तापमानातं घट झाली आहे. आता राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत आहे. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता. त्यावेळी सुद्धा थंडीची तीव्रता कमी झाली होती. पण आता पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली असून भारतीय हवामान खात्याने नुकताच एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. या नवीन अंदाजात हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर च्या शेवटी पाऊस पडू शकतो असे म्हटले आहे. खरेतर गेल्या रविवारपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. दरम्यान कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत नाही तोच…
Maharashtra Onion Rate : लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात दबावात होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळाली आणि याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला बसला. महायुती मधील अनेक दिग्गज नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. कांद्याच्या मुद्द्याने या दिगजांना आसमान दाखवले होते. पण विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला. काल, विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता येत्या 23 तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणूक झाली असल्याने आता कांद्याचे बाजार भाव दबावात येणार की काय अशी भीती आता व्यक्त होताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रात कांद्याला चार ते पाच हजार…
New Business Idea : कोरोना काळापासून भारतात नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दाखवले जात आहे. नोकरीमध्ये शाश्वती नसल्याने आता अनेक जण व्यवसायाकडे वळले आहेत. व्यवसायासाठी शासनाच्या माध्यमातून नागरिकांना मदतही केली जात आहे. नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी सरकार विविध योजना चालवत असून या योजनांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात मदत सुद्धा उपलब्ध होत आहे. मात्र व्यवसाय सुरू करताना सर्वसामान्य तरुणांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाही. दरम्यान, आज आपण मेरठ येथील एका महिलेची यशोगाथा जाणून घेणार आहोत जिने अवघ्या 25 हजार रुपयांमध्ये व्यवसाय सुरू केला, पण आजच्या घडीला या प्रयोगशील महिलेने आपला व्यवसाय 12 ते 13 लाख…
Pm Kisan Yojana News : केंद्रातील सरकारने 2019 मध्ये देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. याचं योजनेची वाढती लोकप्रियता पाहता नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्माननिधी योजना सुरू केली आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वितरित केले जातात. एका वर्षात या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजाराचे तीन हप्ते मिळतात. दरम्यान याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत देखील पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. म्हणजेच…
Solapur News : पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. सोलापुरातील नागरिकांसाठी लवकरच दोन शहरा दरम्यान नवीन विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दरम्यान नवीन विमानसेवा सुरू होणार असून यामुळे मुंबई आणि गोव्याला जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दरम्यान नवीन विमानसेवा सुरू होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीचं या संदर्भात माहिती दिली आहे. मोळ यांनी सांगितल्याप्रमाणे 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दरम्यान…
Soybean Farming : सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव सुद्धा मिळत नाहीये. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील मोदी सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव घोषित केला आहे. पण, त्या दराने देखील महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन खरेदी केले जात नाहीये. फारच कमी शेतकऱ्यांना हमीभावा एवढा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान…