Agriculture News : राज्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. चार मार्चपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला असून सध्या पुणे, अहमदनगर, धुळे, नासिकसह संपूर्ण मध्ये महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सुरू आहे. बहुतांशी ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.
या अवकाळी पावसामुळे अन गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणी झालेल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर फळबाग पिकांचे आणि भाजीपाला पिकांचेही यामुळे मोठे नुकसान नमूद करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना लवकरच मिळणार मोठ गिफ्ट! मुख्यमंत्री शिंदे ‘या’ बहुचर्चित उड्डाणपुलाचे गुढीपाडव्याला करणार उद्घाटन, वाचा सविस्तर
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी अनेक शेतकरी संघटनांनी शासनाला निवेदने दिली आहेत. विरोधकांकडूनही अधिवेशनात याबाबत मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान आता राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना एक मोठ आवाहन केल आहे.
शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना आता अवकाळी मुळे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शासनाकडे पाठवण्यासाठी एक मोबाईल नंबर जारी केला आहे. या मोबाईल नंबर वर आता शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती आणि नुकसानीचे फोटो पाठवता येणे शक्य होणार आहे.
दस्तूर खुद्द कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे मोबाईल क्रमांक जारी केले आहेत. 9922204367 आणि 02222876342 हे क्रमांक कृषिमंत्री सत्तार यांनी जारी केले असून या क्रमांकावर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची माहिती आणि फोटो पाठवावे लागणार आहेत. शेतकरी बांधवांना या मोबाईल क्रमांकावर कॉल करून आपल्या नुकसानीची माहिती संबंधितांना द्यावी लागणार आहे.
दरम्यान राज्यात पुढील तीन दिवस आणखी पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता मात्र शेतकऱ्यांनी आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
हे पण वाचा :- तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांना किती वेतन मिळत, पेन्शन किती? पगाराचा आकडा अन मिळणाऱ्या सोयी सुविधा पाहून विचारात पडाल, पहा…