Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर शेतकऱ्यांना पीक कर्ज काढतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. बँका सिबिलची सक्ती करतात. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही.
शेतकऱ्यांचा सिबिल साहजिकच कमी असतो यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकांकडून नाकारले जाते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने राज्यातील सर्वच राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिलची अट घालू नये असे आदेश दिले आहेत.
यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास सोयीचे होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक कर्ज देतांना सिबिल ची अट घातली जाणार नाही यामुळे त्यांना सहजतेने कर्ज उपलब्ध होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
सिबिल’ स्कोअर कमी असल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असेही ‘एसएलबीसी’ने स्पष्ट केले आहे. पण, तो शेतकरी कोठेही थकबाकीदार नसल्याची पडताळणी करूनच कर्जवाटप करण्याच्याही सूचना केल्या आहेत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार नाफेडची उन्हाळ कांदा खरेदी; दरात वाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ
वास्तविक, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट घालत असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करा असा ईशारा दिला होता.
या इशाऱ्यानंतर मग राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून या संदर्भात मार्गदर्शन मागवले होते. या मार्गदर्शनानंतर आता राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिलची अट घालू नये असे आदेशित केले आहे.
राज्यातील सर्व राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांना या पार्श्वभूमीवर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मात्र कर्ज देताना संबंधित शेतकऱ्यांवर थकबाकी नाही ना याची पुष्टी करण्याची देखील गरज असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
एकंदरीत राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून यामुळे आता शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजतेने मिळणार असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
मात्र याचा अर्थ असा होत नाही की थकबाकीदार शेतकऱ्यांना देखील कर्ज मिळणार. थकबाकीदार शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्ज दिले जाणार नाही असे देखील सांगितलं जात आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बॅंकांनी सिबिल स्कोअरची सक्ती करू नये, अशा सूचना बँकाना प्राप्त झाल्या आहेत. मात्र, संबंधित कर्ज मागणारा व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, अशी अट आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘त्या’ 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार गुड न्युज ! शिंदे सरकार 740 कोटी रुपये करणार वितरित ?, पहा….