Agniveer Bharati : भारतीय सैन्य दलात 2023 24 साठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया अग्निवीरांचीं राहणार आहे. यासंदर्भात आर्मी रिक्रुटींग ऑफिस मुंबई यांनी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic या अधिकृत संकेतस्थळावर ही अधिसूचना जारी झाली आहे. या अधिसूचनेच्या माध्यमातून सुचित करण्यात आले आहे की ही भरती प्रक्रिया राजधानी मुंबई सह एकूण आठ जिल्ह्यात राबवली जाणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी खुशखबर ! पुणे महापालिकेत निघणार मोठी भरती; ‘या’ पदाच्या रिक्त जागासाठी होणार भरती, वाचा सविस्तर
यासाठी सद्यस्थितीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. यासाठीची ऑनलाईन नोंदणी करताना सर्वप्रथम उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या पदभरतीसाठी 15 मार्च 2023 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अग्निवीर भरती प्रक्रियेत झालेल्या नवीन बदलानुसार ही भरती प्रक्रिया एकूण दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. सुरुवातीला संगणक आधारित लेखी परीक्षा पार पडणार आहे त्यानंतर रॅली म्हणजेच शारीरिक चाचणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात ‘या’ तारखेपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार; महसूलमंत्र्यांची माहिती
अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर किपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास) या पदांसाठी ही पदभरती राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही पदभरती मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी राबवली जात आहे. दरम्यान या पदभरती अंतर्गत अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा होणार आहे.
हे पण वाचा :- राजधानी मुंबईत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! MSTC अंतर्गत ‘या’ पदाची भरती सुरू; आवश्यक पात्रता आणि अर्ज करण्याची प्रोसेस पहा
ही परीक्षा वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर या परीक्षेच्या आधारावर मे 2023 मध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. यानंतर मग निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी म्हणजेच भरती रॅलीसाठी भारतीय सैन्य दलाकडून नियुक्त करण्यात आलेल्या वेळेत आणि ठिकाणी घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी नंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीमध्ये अग्निवीर निवडले जातील. यानंतर भारतीय सैन्य दरात या अग्निवेरांना समाविष्ट केलं जाणार आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! अग्निवीर भरतीचीं तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी; आता थेट भरतीच्या प्रक्रियेमध्येच केला ‘हा’ मोठा बदल