1st Installment Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना सुरू केल्या जातात. दरम्यान यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मोठ्या योजनेची घोषणा केली.
ती योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव नसून ही योजना नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची योजना अर्थातच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू झालेली महाराष्ट्र राज्य शासनाची योजना आहे.
हे पण वाचा :- पुणे-सिकंदराबाद दरम्यान आता शताब्दी ऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार? समोर आली तिकीट दराबाबत मोठी माहिती, पहा…..
दरम्यान आता या नमो शेतकरी योजनेबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ नवीन आर्थिक वर्षात मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल नंतर या योजनेचा पहिला हप्ता देऊ केला जाणार आहे.
किती लोकांना मिळणार लाभ
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजनेचा राज्यातील 79 लाख 25 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असं सांगितलं होतं.
हेही वाचा :- मोठी बातमी ! कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस? केंद्रीय मंत्री सिंधीया करणार पाठपुरावा
पण प्रत्यक्षात ही योजना पीएम किसानच्या धर्तीवर असल्याने पीएम किसानचे सध्या लाभार्थी 79 लाख 25 हजार आहेत यामुळे नमो शेतकरी योजनेला देखील तेवढेच लाभार्थी पात्र ठरणार आहेत. म्हणजेच जे शेतकरी पीएम किसानला पात्र राहतील तेच शेतकरी या नमो शेतकरी योजनेला पात्र ठरणार आहेत.
योजनेसाठी निकष काय
या योजनेचा लाभ एक फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच एक फेब्रुवारी 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन झाली असेल अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
नवीन आर्थिक वर्षात याचा लाभ मिळणार आहे. साधारणतः एप्रिल नंतर या योजनेचा पहिला हप्ता येऊ शकतो.
एकाच सातबारा उताऱ्यावरील कुटुंबप्रमुख त्याची पत्नी व 18 वर्षांखालील दोन अपत्य, असे कुटुंब ग्राह्य धरून लाभ हा दिला जाणार आहे.
पीएम किसान योजनेप्रमाणे वर्षात सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. नमो शेतकरी योजनेत देखील पीएम किसान प्रमाणे दोन हजाराचा एक हप्ता राहणार असून एकूण तीन हफ्त्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेचा लाभ अल्पभूधारक तसेच अधिक जमीन असलेला शेतकरी देखील घेऊ शकणार आहे.
या योजनेचा लाभ मात्र लागवडी योग्य शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
याशिवाय ज्या शेतकऱ्यांची जमीन एक फेब्रुवारी 2019 पूर्वी असली तरी देखील त्यांनी जर केवायसी केलेली नसेल व बँक खात्याला आधार लिंक केलेले नसेल शिवाय आपल्या एकूण मालमत्तेची माहिती महसूल विभागाला दिलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना तूर्तास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या केवायसी न केलेल्या, महसूल विभागाला मालमत्तेची माहिती न दिलेल्या शेतकऱ्यांना ठराविक कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत संबंधित प्रक्रिया या शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यांना या योजनेपासून कायमचे वंचित ठेवले जाणार आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ लोकांचे रेशन कार्ड झाले बंद; तहसीलला रेशन कार्ड जमा करण्याचे आवाहन; यादीत तुम्हीही आहात का?
केव्हा मिळणार नमो शेतकरीचा पहिला हप्ता?
हाती आलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला की दहा ते पंधरा दिवसात देण्याचे नियोजन राज्य शासनाच्या माध्यमातून आखलं जात आहे. यामुळे जेव्हा पीएम किसान चा चौदावा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल त्याच्या दहा ते पंधरा दिवसानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना देऊ केला जाणार आहे.