Women Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील देशभरातील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये केंद्राच्या मोदी सरकारने सुरू केलेल्या लखपती दिदी योजनेचा देखील समावेश होतो. ही योजना देशातील महिलांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध व्यासपीठांवरून माहिती दिली आहे. लखपती दीदी योजनेच्या लाभार्थ्यांसोबत नरेंद्र मोदी यांनी मागे एक कार्यक्रम घेऊन बातचीत सुद्धा केली होती. या योजनेमुळे देशभरातील महिलांना आर्थिक प्रगती साधता येत आहे. या योजनेचा अर्थसंकल्पात देखील उल्लेख झाला होता.
मात्र असे असले तरी या योजनेची अनेकांना माहिती नसल्याचे उघडकीस आले आहे. अनेक महिलांना लखपती दिदी योजना नेमकी काय आहे, या अंतर्गत कोणकोणते लाभ त्यांना मिळतात याविषयी माहिती नाहीये. यामुळे आज आपण या योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे लखपती दीदी योजना
मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत या योजनेचा देशभरातील एक कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे. विशेष म्हणजे या योजनेचे उद्दिष्टे देखील आता वाढवण्यात आले आहे. वर्तमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेअंतर्गत आता देशभरातील दोन कोटी महिलांना नाही तर तीन कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे.
म्हणजेच, या योजनेचे उद्दिष्टे एक कोटी लाभार्थ्यांनी वाढवले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे. एलईडी बल्ब बनवणे, ड्रोन चालवणे, ड्रोन दुरुस्ती करण्यासह प्लंबिंगचे प्रशिक्षण असे वेगवेगळ्या कौशल्याचे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जात आहे.
ही योजना फक्त प्रशिक्षणच देते असे नाही तर महिलांना आर्थिक मदतही पुरवत आहे. ही योजना राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जात असल्याची माहिती सरकारकडून मिळाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक मदत म्हणून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
किती कर्ज मिळते
ही योजना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती. तेव्हापासून या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना याचा लाभ मिळाला असून आणखी तीन कोटी महिलांना याचा लाभ पुरवला जाणार आहे. या अंतर्गत एक लाखांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
विविध कौशल्याचे प्रशिक्षण देखील ही योजना पुरवते. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते. म्हणजेच फक्त कर्जाची रक्कम महिलांना फेडावी लागते. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याज आकारले जात नाही.
कशी असते प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागीय बचत गटाकडे नोंदणी करावी लागते. ज्या महिलांची विभागीय बचत गटाकडे नोंदणी असते त्यांनाच या अंतर्गत लाभ मिळतो. विभागीय बचत गटात जाऊन अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो. या योजनेसाठी व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. अर्ज केल्यानंतर अर्जाची पाहणी होते, अर्जाची पडताळणी पूर्ण केली जाते आणि यानंतर मग सदर लाभार्थी महिलेला या योजनेअंतर्गत कर्ज मिळते.
आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता
या योजनेअंतर्गत देशभरातील महिला पात्र ठरतात. मात्र या योजनेचा लाभ महिला बचत गटात सदस्य असलेल्या महिलांनाच मिळतो. 18 ते 50 वर्षे वयोगटातील महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, एक फोटो अशी महत्त्वाची कागदपत्रे या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असतात.