Women Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी सातत्याने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून महिलांसाठीही अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील गरजवंत महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रातील सरकारने देखील महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
लखपती दीदी या योजनेचा देखील यामध्ये समावेश होतो. या अंतर्गत देशभरातील महिलांना लखपती बनवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. याचा आतापर्यंत नऊ कोटी महिलांनी लाभ घेतला आहे. खरेतर अलीकडे महिलांनी प्रत्येकच क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी केली आहे.
दरम्यान, सरकारने आता महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ही योजना गेल्या वर्षापासून म्हणजेच 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत वेगवेगळे कौशल्य शिकवले जाणार आहे.
योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2023 पासून झाली आहे. या योजनेतून महिलांना वेगवेगळे कौशल्य शिकवले जाते तसेच त्यांना आर्थिक मदतही केली जाते. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
हे कर्ज बिनव्याजी असल्याने कर्जाचा भार महिलांवर येत नाही. योजनेचा लाभ महिला बचत गटातील महिलांना दिला जातो. 18 ते पन्नास वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र ठरतात.
या अंतर्गत आर्थिक साक्षरता वर्कशॉप, सेव्हिंग इन्सेंटिव्ह, मायक्रोक्रेडिट सुविधा, स्किल डेव्लपमेंट, वोकेशनल ट्रेनिंग, व्यावसायिक प्रशिक्षण अशा स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते.
यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. जिल्ह्याच्या महिला व बाल कल्याण विकास विभागात यासाठी अर्ज करता येतो. या योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला महिला व बालकल्याण विकास विभागात उपलब्ध होणार आहे.
हा अर्ज महिलांनी काळजीपूर्वक भरायचा आहे आणि अर्जासोबतच आधारकार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, पॅन कार्ड, बँक खाते पासबुक असे काही महत्वाचे कागदपत्रे द्यावे लागतात.