Wheat Variety : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरवात झाली आहे. रब्बी हंगामातील गहू अन हरभरा पिकांच्या पेरणीला मोठा वेग आला आहे. आगात गहू आणि हरभरा पेरणी अनेक ठिकाणी पूर्ण सुद्धा झाली आहे.
तर काही शेतकरी बांधव येत्या काही दिवसात या पिकांची पेरणी करणार आहे. दरम्यान रब्बी हंगामात गहू पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.
कारण की आज आपण गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया गव्हाच्या सुधारित जातींची माहिती.
गव्हाच्या या जातीची निवड केल्यास मिळणार विक्रमी उत्पादन
गव्हाची पेरणी ही एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळात केल्यास चांगले उत्पादन मिळते. या काळात पेरणी केल्यास वेळेवर गहू पेरणी केली असे म्हणतात. दरम्यान आता आपण वेळेवर गहू पेरणी करण्यासाठी उपयुक्त गव्हाच्या जातींची माहिती पाहणार आहोत.
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर गहू पेरणी करायचा असेल तर शेतकऱ्यांनी एन आय ए ड्ब्ल्यू ३०१ (त्र्यंबक), एन आय ए ब्ल्यु ९१७ (तपोवन), एन आय ए ब्ल्यु २९५ (गोदावरी) या बागायती भागासाठी वेळेवर पेरणीकरीता शिफारशीत गव्हाच्या जातींची निवड करायला हवी.
या जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना नक्कीचं चांगले विक्रमी उत्पादन मिळणार आहे. तसेच जर बागायती भागात उशिरा पेरणी करण्याचा प्लॅन असेल तर शेतकऱ्यांनी एन आय ए ब्ल्यु ३४, ए के ए ब्ल्यु ४६२७ या वाणाची निवड करायला हवी.
मात्र गव्हाची पेरणी ही 15 डिसेंबर नंतर करू नये. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा काळ उशिरा गहू पेरणीसाठी उपयुक्त आहे. परंतु 15 डिसेंबर नंतर गहू पेरणी केल्यास अपेक्षित उत्पादन मिळतं नाही.
किंबहुना 15 नोव्हेंबर नंतर गव्हाची पेरणी केल्यास उत्पादनात घट होते. तथापि काही कारणास्तव एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गहू पेरणी करता आली नाही तर पंधरा डिसेंबर पर्यंत गहू पेरणी करता येऊ शकते.
शिवाय ज्या शेतकऱ्यांना जिरायत भागात पेरणी करायची असेल त्यांनी एन आय डी ब्ल्यु १५ (पंचवटी), ए के डी ब्ल्यु ३९९७ (शरद) या वाणाची निवड करायला हवी. ज्यांच्याकडे पाण्याचे प्रमाण कमी असेल त्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या निफाड ३४, एन आय ए ब्ल्यू १४१५ (नेत्रावती) या वाणाची निवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल.