Wheat Rate Maharashtra : गहू हे रब्बी हंगामातील एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रासहित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या गव्हाच्या दरात मोठी विक्रमी तेजी आली आहे.
अजूनही बाजारभावात वाढ सुरूच आहे. केंद्रातील मोदी सरकारने 2023-24 हंगामासाठी गव्हासाठी 2125 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या बाजारात गव्हाला एमएसपीच्या म्हणजेच हमीभावापेक्षा दुप्पट दर मिळतं आहे.
यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना या तेजीचा मोठा फायदा मिळत आहे. देशासह राज्यातील अनेक बाजारांमध्ये सध्या गहू एमएसपीपेक्षा कितीतरी जास्त किमतीत विकला जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, मध्य भारतातील अशोक नगर मंडईत गव्हाला 4500 रुपये एवढा भाव मिळाला आहे.
हा भाव आजपर्यंतचा सर्वोच्च भाव आहे. देशातील इतरही अनेक मंडईंमध्ये गव्हाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
मात्र, सध्या मिळत असलेला विक्रमी बाजार भाव भविष्यात देखील कायम राहणार का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत बाजार अभ्यासाकांनी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती दिली आहे.
गव्हाला महाराष्ट्रात काय भाव मिळतोय ?
सोलापूरच्या बाजारात गव्हाचा भाव 4130 रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे.
हिंगोली बाजारात गव्हाचा भाव 3555 रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे.
उमरेड बाजारात गव्हाचा भाव 3100 रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे.
पैठणच्या एपीएमसीमध्ये गव्हाचा भाव 2900 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद केला जात आहे.
भोकरदनच्या बाजारात गव्हाचा भाव 2800 रुपये प्रतिक्विंटल आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाचा भाव हा 2711 रुपये प्रतिक्विंटल आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाचा भाव 2401 रुपये प्रतिक्विंटल आहे.
किल्ले धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाचा भाव 2250 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
आगामी काळात कशी राहणार बाजारभावाची स्थिती
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाच्या दरात आगामी काही दिवस चढ-उतार सुरूच राहणार आहे. गव्हाच्या दरात 400-500 रुपयाची चढ-उतार पाहायला मिळणार आहे. खरेतर बाजारात नवीन पीक येण्यास अजून काही काळ बाकी आहे. अशा परिस्थितीत गव्हाचे भाव येत्या काही दिवसांमध्ये वधारणार असल्याचे बोलले जात आहे.
तथापि, गव्हाच्या दरात थोडीशी घसरण होण्याची देखील शक्यता आहे. मात्र गव्हाच्या बाजारभावात फार मोठी घसरण होणार नाही. गव्हाचे बाजार भाव हमीभावापेक्षा अधिकच राहणार आहे. एकंदरीत नवीन पीक येईपर्यंत गव्हाचे बाजारभाव चढेचं राहू शकतात असा अंदाज यांनी दिला आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची साठवणूक केली आहे त्यांना चांगला फायदा मिळतं आहे. एकंदरीत मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत बाजारभावात अशीच तेजी राहू शकते. मात्र त्यानंतर बाजारभावात काहीशी घसरण होणार असा अंदाज तज्ञांनी दिला आहे.