Wheat New Variety : गहू हे भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. यंदाच्या रब्बी हंगामातही गव्हाची आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. राज्यातही गव्हाची लागवड केली जाते आणि यंदाही राज्यात गहू लागवड विशेष उल्लेखनीय राहील असा विश्वास व्यक्त होत आहे.
यंदा जर पाऊसमान चांगले राहिले तर गव्हाची लागवड किंचित सुधारणार असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. अशातच महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील गहू उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे देशातील शास्त्रज्ञांनी गव्हाचे एक नवीन वाण विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकातून अधिकचे उत्पादन मिळवता येईल आणि यामुळे त्यांची कमाई वाढणार आहे.
नव्याने विकसित झालेली गव्हाची ही जात आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी देखील उपलब्ध होणार असल्याने यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे गव्हाचे उत्पादन वाढणार आहे.
दरम्यान आता आपण भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडेच विकसित केलेल्या गव्हाच्या या नवीन जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गव्हाचे हे नवीन वाण ठरणार फायदेशीर
ICAR प्रादेशिक केंद्र इंदूरने गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. पुसा गहू शरबती म्हणजे HI 1665 या नावाने गव्हाचे हे नवीन वाण ओळखले जात आहे. ही नवीन जात अलीकडेच प्रसारित झाली आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतात या जातीची लागवड करता येणे शक्य होणार आहे.
ही जात अवघ्या 110 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होणार असून यातून शेतकऱ्यांना हेक्टरी 33 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येणे शक्य असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.
मात्र हे सरासरी उत्पादन असून या जातीपासून जवळपास 44 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येऊ शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे.
या जातीची सर्वात मोठे विशेषता म्हणजे याला जास्त सिंचनाची गरज नाहीये, ही जात तीव्र उष्णता आणि दुष्काळ सहन करण्यास सक्षम असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही जात आपल्या महाराष्ट्रातही लागवडीसाठी शिफारशीत आहे. यासोबतच मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मैदानी भागासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.