Wheat Farming : खरीप हंगामानंतर आता महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. तर काही ठिकाणी मान्सून काळात पाऊसचं झाला नसल्याने त्या ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी शेतकऱ्यांना करता आलेली नाही.
तसेच काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला आहे पण अजूनही अशा भागात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झालेली नाही. आपल्या राज्यात रब्बीमध्ये गहू आणि हरभरा या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात असते.
याही वर्षी ज्या ठिकाणी चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे तेथे गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे.
गहू उत्पादनाचा विचार केला तर भारत हा गहू उत्पादनाच्या बाबतीत जगात सर्वोच्च स्थानावर विराजमान आहे. ज्याप्रमाणे आपल्या देशात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते त्याचप्रमाणे गव्हाची खपत देखील आपल्याचं देशात सर्वाधिक आहे.
त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना अधिका-अधिक गहू लागवड करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. कृषी तज्ञांनी मात्र गव्हाच्या पिकातून चांगले विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.
सोबतच शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी योग्य वेळी केली पाहिजे असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाचे पेरणी करण्याची योग्य वेळ कोणती, गव्हाची पेरणी नेमकी केव्हा केली पाहिजे याबाबत कृषी तज्ञांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण अशा माहिती विषयी जाणून घेणार आहोत.
काय म्हणताय कृषी तज्ञ
गहू हे रब्बी हंगामात पेरले जाणारे एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. याची पेरणी साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून नोव्हेंबरअखेरपर्यंत केली जाते. तसेच गव्हाची उशिरा पेरणी डिसेंबरअखेर पर्यंत केली जाते.
पण चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी माझी वेळेवर पेरणी केली पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गव्हाची वेळेवर पेरणी 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीत केली पाहिजे.
मात्र जर या वेळेत शेतकऱ्यांना कवाची पेरणी करता आली नाही तर शेतकरी बांधव 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत देखील गव्हाची उशिराने पेरणी करू शकता. तथापि, गव्हाची उशिरा लागवड केल्यास उत्पादनात घट येते. कृषी शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा सरासरी तापमान 22 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते त्यावेळी गव्हाची पेरणी केली पाहिजे.
खरंतर अधिक तापमान गव्हाच्या पिकाला मानवत नाही. त्यामुळे ज्यावेळी कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते त्यावेळी गहू पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो. गहू पेरणीसाठी 22° c पर्यंतचे तापमान सर्वाधिक अनुकूल असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.