Wheat Farming : गव्हाच्या (Wheat Crop) लागवडीमध्ये आणि उत्पादनात (Wheat Production) आपल्या देशाला महत्त्वाचे स्थान आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश ही गव्हाची मुख्य उत्पादक राज्ये आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील गव्हाची शेती (Cultivation Of Wheat) विशेष उल्लेखनीय आहे.
खरीप हंगामात आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) गव्हाची लागवड करून चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) देखील करत आहेत. भारतात आज 80 दशलक्ष टनांहून अधिक गव्हाचे उत्पादन होत आहे. मात्र, देशाची वाढती लोकसंख्या पाहता गव्हाच्या उत्पादनात आणखी वाढ करण्याची गरज आहे. यासाठी गव्हाच्या प्रगत उत्पादन तंत्राचा अवलंब करण्याची गरज आहे.
या तंत्रांमध्ये वाणांची निवड, पेरणीच्या पद्धती, बियाणे दर, पोषक व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि पीक संरक्षण इत्यादींचा समावेश होतो. जाणकार लोकांच्या मते जर शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची (Wheat Variety) लागवड केली तर निश्चितच त्यांना गव्हाच्या शेतीतून चांगली कमाई होणार आहे. शिवाय गव्हाच्या उत्पादनात भारत अजूनच सक्षम होणार आहे.
भारतवर्षात लागवड केल्या जाणाऱ्या गव्हाच्या सुधारित जातीं खालीलप्रमाणे :-
जाणकार लोकांच्या मते, गहू उत्पादक शेतकरी बांधवांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रचलित आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारी तसेच रोगास प्रतिकारक गव्हाच्या जातीची निवड करावी. गव्हाच्या पिकापासून चांगले उत्पादन घेता यावे म्हणून काही लोकप्रिय व सुधारित वाण पुढीलप्रमाणे आहेत-
बागायती स्थितीत वेळेवर पेरणी- HD- 2967, HD- 4713, HD- 2851, HD- 2894, HD- 2687, DBW-17, PBW- 550, PBW-502, WH-542, W-H-896 आणि UP-2338 हे मुख्य आहेत, पेरणीची योग्य वेळ 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर ही मानली जाते.
बागायती स्थितीत उशीरा म्हणजे पसात पेरणी – HD – 2985, WR – 544, Raj – 3765, PB W – 373, DB W – 16, W H – 1021, PB – 590 आणि UP – 2425 इ. या जातीच्या गव्हाच्या पेरणीसाठी 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर पर्यंतची वेळ योग्य मानली जाते.
सिंचन नसलेल्या/कोरडवाहू भागात वेळेवर पेरणी – HD – 2888, PBW – 396, PBW – 299, WH – 533, PBW – 175 आणि कुंदन इ. गव्हाच्या जातींची आपल्या भारतात पेरणी केली जाते.
खारट जमिनीसाठी- KRL-1, 4 आणि 19 या जाती महत्वाच्या असून या जातींची आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.