Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासहित देशभरातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तथा विदर्भातील काही भागांमध्ये लागवड पाहायला मिळते. या पिकाची प्रमुख बागायती भागांमध्ये शेती होती. गव्हाची शेती रब्बी हंगामामध्ये केली जाते.
सध्या रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग युद्ध पातळीवर सुरू आहे. रब्बी हंगामातील गहू या मुख्य पिकाची आपल्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या स्थितीला हार्वेस्टिंग सुरू असून देशातील इतरही अनेक राज्यांमध्ये गव्हाची काढणी प्रगतीपथावर आहे.
दरम्यान आज आपण गव्हाच्या पाच सर्वोत्कृष्ट जातींची माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या जातींपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे या जातींची आज आपण माहिती पाहणार आहोत.
गव्हाच्या पाच सर्वोत्कृष्ट जाती कोणत्या ?
गहू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कृषी तज्ञांनी काही सुधारित जातींची शिफारस केली आहे. जर तुम्हीही गव्हाचे पीक घेणारे शेतकरी असाल तर तुम्ही याच्या सुधारित जातींची पेरणी केली पाहिजे असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळू शकते असे तरुण यांनी सांगितले आहे.
बुंदेलखंड विद्यापीठातील कृषी तज्ज्ञ आणि कृषी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.संतोष पांडे यांनी या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.
ते म्हणालेत की, शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी पुसा एचआय 8759, श्रीराम 303, टीव्हीडब्ल्यू 222, एचडी 2967 आणि एचआय 8673 या 5 जातींची लागवड केल्यास त्यांना चांगली दर्जेदार उत्पादन मिळणार आहे.
या जाती गव्हाच्या शीर्ष 5 जातींमध्ये येतात. या वाणांची लागवड करून शेतकरी कमी खर्चात अधिक दर्जेदार उत्पादन घेऊ शकणार आहेत. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, वर नमूद केलेल्या या सर्व जाती 145 ते 150 दिवसांत परिपक्व होत असतात.
या जातीची पेरणीची वेळ ही १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर अशी आहे. त्यांची उंची सरासरी 80 ते 85 सेंटीमीटर असते. यातून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
या जातीची पेरणी केल्यानंतर योग्य नियोजन केले तर यातून चांगले उत्पादन मिळू शकते असा दावा कृषी तज्ञांनी केला अशी आहे. या जाती गव्हावर येणाऱ्या विविध रोगांसाठी प्रतिकारक असल्याचे म्हटले जात आहे.