Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. रब्बी हंगामात उत्पादित होणारे हे पीक राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते.
गव्हाच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. मात्र असे असले तरी या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक असते.
गव्हाची लागवड ही काळ्या कसदार जमिनीत मोठ्या प्रमाणात होते. सुपीक जमिनीतून या जातीपासून चांगले उत्पादन मिळते. दरम्यान आज आपण गव्हाच्या अशा एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत
याची लागवड चिकन माती असणाऱ्या जमिनीत देखील करता येऊ शकते आणि अशा जमिनीत लागवड केल्यावरही या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य आहे.
गव्हाची ही जात शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर!
पुसा मालवी एचडी ४७२८ ही गव्हाची एक प्रगत आणि सुधारित जात आहे. या जातीच्या गव्हाचे दाणे जाड व चमकदार असतात. ही जात पेरणी केल्यानंतर साधारणतः 120 दिवसांत हार्वेस्टिंग साठी रेडी होते म्हणजेच परिपक्व होते.
गव्हाची ही जात काही रोगांसाठी प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. पानांवर आणि देठावरील तांबेरा रोगासाठी ही जात प्रतिरोधक असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीची सरासरी उत्पादन क्षमता 54.2 क्विंटल एवढी आहे
आणि कमाल उत्पादन क्षमता प्रति हेक्टर 65 क्विंटलपर्यंत आहे. या जातीचा गहू हा रवा बनवण्यासाठी विशेष उपयुक्त आहे. रव्यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी या जातीच्या गव्हाची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.
या जातीच्या गव्हाच्या पेरणीच्या वेळी 20 ते 25 अंश सेल्सिअस एवढे तापमान असल्यास या जातीपासून विक्रमी उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या जातीच्या गव्हाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत केली जात असली
तरी त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी चिकणमाती असणारी जमीन योग्य आहे. नोव्हेंबर महिना या जातीच्या पेरणीसाठी अतिशय योग्य मानला जातो. या जातीची पेरणी करण्यासाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे.
फवारणी पद्धतीने गव्हाची पेरणी करण्यासाठी हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे वापरावे. चांगले उत्पादन मिळवण्यासाठी बियाण्यांबरोबरच खताचे प्रमाणही लक्षात ठेवावे.