Wheat Farming : देशात खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या संपूर्ण देशभर सुगीचे दिवस सुरू आहेत. खरीप हंगामातील विविध पिकांची हार्वेस्टिंग केली जात आहे. कापूस वेचणी, सोयाबीन आणि उडीद हार्वेस्टिंग सारखी कामे सध्या देशात युद्धपातळीवर सुरू आहेत.
येत्या काही दिवसांनी आता रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान रब्बी हंगाम सुरू होण्याआधीच आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण गव्हाच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर देशातील कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांचे गहू उत्पादन वाढावे या अनुषंगाने गव्हाच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्या आहेत. HD 3410 ही देखील गव्हाची अशीच एक सुधारित जात आहे. ही जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केली आहे.
ही जात कमी दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते आणि या जातीपासून शेतकऱ्यांना चांगली उत्पादन मिळत आहे. दरम्यान, आता आपण या गव्हाच्या सुधारित जातीची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
HD 3410 वाणाच्या विशेषता
गव्हाची ही जात फेब्रुवारी 2023 मध्ये विकसित करण्यात आली. पुढे केंद्रातील सरकारने या जातीला पेरणीसाठी मान्यता दिली. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गव्हाची ही जात अवघ्या १३० दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते. ही जात बागायती क्षेत्रात पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे.
गव्हाच्या पिकात येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांमध्ये ही जात प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. यामुळे यापासून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळू शकते असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या जातीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना कमी करता अधिकचे उत्पादन मिळणार आहे.
उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये बागायती भागासाठी ही जात अधिसूचित करण्यात आली आहे. खरे तर या जातीला कमी पाणी लागते मात्र याची लागवड फक्त बागायती भागातच होऊ शकते.
कोरडवाहू मध्ये लागवड केली तर या जातीपासून अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. कृषी तज्ञ सांगतात की इतर सामान्य जातीच्या पिकाला परिपक्व होण्यासाठी जवळपास 125 दिवसांचा कालावधी लागतो. परंतु गव्हाचा हा वाण अवघ्या 130 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होतो.
गव्हाचा हा वाण चपातीसाठी उत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो. सोबतच ब्रेड, बिस्किटे बनवण्यासाठी देखील हा गहू उत्कृष्ट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बाजारात या जातीच्या गावाला चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. परिणामी गव्हाच्या या वाणापासून शेतकऱ्यांना अधिकची कमाई होत आहे.