Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. रब्बी हंगामात गव्हा सोबतच हरभऱ्याची देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. गहू लागवडी बाबत बोलायचं झालं तर राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अर्थातच महाराष्ट्रात सर्वदूर या पिकाची लागवड होते.
बागायती भागात या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते आणि यातून बागायती भागातील शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. गहू पेरणी बाबत बोलायचं झालं तर कोरडवाहू गहू पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आणि बागायती भागातील गहू पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करण्याचा सल्ला दिला जातो.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही गव्हाची पेरणी केली जाऊ शकते. काही शेतकरी बांधव जवळपास 15 डिसेंबर पर्यंत गव्हाची पेरणी करत असतात. मात्र 15 नोव्हेंबर नंतर केलेल्या गहू पेरणीतून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. 15 डिसेंबर नंतर तर गव्हाची पेरणी करूच नये अन्यथा उत्पादनच मिळणार नाही.
गहू पेरणी करताना टाइमिंग तर महत्त्वाचा असतोच शिवाय खत व्यवस्थापन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरते. योग्य खतांचा वापर केल्यास गव्हाच्या पिकातून नक्कीच जबरदस्त उत्पादन मिळत असते. आता आपण गहू पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
गहू पिकाची पेरणी करण्यापूर्वी जमिनीची चाचणी म्हणजे माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. माती परीक्षण केल्याने तुमच्या जमिनीत कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे आणि कोणते पोषक तत्व किती प्रमाणात उपलब्ध आहेत हे कळू शकते. त्यानंतर मग शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने खतांचा वापर केला पाहिजे.
दरम्यान आज आपण जर शेतकऱ्यांना माती परीक्षण करता आले नाही तर विना माती परीक्षण कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर करायचा याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. गहू पिकाची पेरणी करण्यापूर्वी, शेताची अंतिम नांगरणी करताना, प्रति एकर 100 क्विंटल कुजलेले शेणखत टाकता येते.
कुजलेल्या शेणात पोषक घटक आढळतात. 20 ते 25 टक्के सेंद्रिय कार्बनही आढळतो. जर शेतकऱ्यांना मातीची चाचणी करता आली नसेल, तर ते संतुलित प्रमाणात म्हणजे 60 किलो नायट्रोजन प्रति एकर, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश आणि 10 किलो प्रति एकर सल्फर आणि जस्त वापरू शकतात.
स्फुरद, पोटॅश, गंधक आणि जस्त यांची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी बेसल डोस म्हणून दिली जाऊ शकते हे लक्षात ठेवा. तर नत्राचे प्रमाण दोनदा वापरावे. पहिले सिंचन आणि दुसरे सिंचन करताना नत्राचा ५०-५०% वापर करावा.