Wheat Farming : भारतात गव्हाची शेती (Wheat Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यातही गहू (Wheat Crop) लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो गहू हे रबी हंगामातील (Rabbi Season) एक मुख्य पीक आहे. आगामी काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.
अशा परिस्थितीत देशातील तमाम गहू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Wheat Grower Farmer) एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार पंजाब कृषी विद्यापीठाने गव्हाच्या नवीन तीन जाती (Wheat Variety) विकसित केल्या आहेत.
पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना यांनी विकसित केलेले हे गव्हाचे वाण येत्या रब्बी हंगामापासून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध होणार असल्याचे समजतं आहे. त्यामुळे देशातील गहू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. PBW 872, PBW 833 आणि PBW 826 या तीन जाती पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. या जातींपैकी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक जात महत्त्वाची राहणार आहे. PBW 826 ही जात आपल्या महाराष्ट्रात देखील लागवड करता येणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, PBW 826 ही जात पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र ,उत्तराखंड, जम्मू आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकरी बांधवांना पेरणी करता येणार आहे. याशिवाय ही जात उत्तर पश्चिम मैदानी प्रदेशासाठी देखील उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे.
मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पीबीडब्ल्यू 826 या जातीची पेरणी वेळेवर आणि बागायती भागात केली जाऊ शकते. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित भागात तीन वर्षांच्या चाचणी दरम्यान ही जात धान्य उत्पादनाच्या बाबतीत प्रथम स्थानावर राहिली आहे. निश्चितच यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना देखील मोठा दिलासा मिळणार असून नवीन सुधारित जातीच्या पेरणीमुळे शेतकरी बांधवांचे उत्पादन वाढणार आहे.