Wheat Farming : आपला देश हा कृषी प्रधान देश (Agriculture Country) आहे. येथील बहुतांश शेतकरी (Farmer) शेतीवर (Farming) अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी दर्जेदार जातीच्या बियाण्यांना शेतकरी अधिक प्राधान्य देतात.
मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात (Rabbi Season) गहू या पिकाची (Wheat Crop) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या राज्यात देखील गव्हाची शेती केली जात आहे. देशातील गहू उत्पादक शेतकरी कायमच नवीन आणि रोग प्रतिरोधक आणि चांगले दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड करण्यास प्राधान्य देतात.
जेणे करून त्यांना अधिक उत्पादन मिळेल आणि चांगला नफा मिळू शकेल. अशा परिस्थितीत आज आपण देखील गव्हाच्या एका सुधारित जातीची (Wheat Variety) माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण गव्हाच्या 1636 या जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ही गव्हाची नवीन जात मध्य प्रदेशात तयार करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी इंदूरमध्ये प्लॉट टाकून आणि पुढील दोन वर्षांसाठी इंदूरसह नर्मदापुरम, जबलपूर आणि सागर येथील संशोधन केंद्रांवर संशोधन करण्यात आले. उच्च तापमानातही हा गहू वेळेपूर्वी पिकत नसल्याचे संशोधनात आढळून आले.
नर्मदापुरम, इंदूर, जबलपूर आणि सागर या संशोधन केंद्रांवर तीन वर्षांच्या संशोधनानंतर गव्हाच्या 1634 आणि 1636 या नवीन जाती सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्याचे प्रमाणित बियाणे रब्बी हंगामात बाजारात उपलब्ध होईल.
दोन्ही नवीन वाणांचा गहू उच्च तापमानातही अकाली पिकणार नाही. त्यामुळे उत्पन्नात घट होणार नाही. किंबहुना, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उच्च तापमानामुळे गव्हाचे जुने वाण वेळेआधीच पिकू लागले आहे. संशोधनादरम्यान असे आढळून आले की यामुळे उत्पादनात 20% घट होत आहे. यामुळे या दोन नवीन जाती तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच ही जात उच्च तापमानात देखील चांगले उत्पादन देणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणारं आहे.