Wheat Farming : संपूर्ण भारत वर्षात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन करण्यात व्यस्त आहेत. खरीप हंगाम संपताच शेतकरी बांधव रब्बी हंगामाच्या (Rabbi Season) पेरणीसाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे.
मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात विविध पिकांची शेती केली जाते त्या पिकांमध्ये गव्हाचा देखील समावेश आहे. गहू (Wheat Crop) हे एक रब्बी हंगामातील मुख्य पीक असून या पिकाची आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
दरम्यान गहू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Wheat Grower Farmer) एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो विवेकानंद हिल कृषी संशोधन संस्थेने गहू उत्पादक शेतकरी बांधवांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने गव्हाची एका नवीन जातीची (Wheat Variety) निर्मिती केली आहे.
मित्रांनो अल्मोडा येथील विवेकानंद हिल कृषी संशोधन संस्थेने गव्हाची नवीन जात तयार केली आहे. शास्त्रज्ञांनी या जातीला VL 2041 असे नाव दिले आहे. असे सांगितले जात आहे की बेकरी उत्पादने बनवण्यासाठी ही जात चांगली राहणार आहे.
निश्चितच आगामी काही दिवसात गहू पेरणीला सुरुवात होणार असल्याने बातमी देशातील गहू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची सिद्ध होणार आहे. दरम्यान आज आपण गव्हाच्या या नवीन जाती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया गव्हाच्या नवीन जातीच्या विशेषता.
गव्हाची ही जात या राज्यांसाठी योग्य राहणार आहे
अल्मोडा येथील विवेकानंद हिल अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या VL 2041 या जातीची माहिती नुकत्याच झालेल्या 61 व्या भारतीय गहू आणि बार्ली संशोधकांच्या वार्षिक बैठकीत सांगण्यात आली आहे. शास्त्रज्ञांच्या मते ही जात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्मीर, मणिपूर येथील शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. निश्चितच ही जात मैदानी भागात लावली जाणार नसली तरीदेखील डोंगराळ भागात या जातीचा फायदा होणार आहे.
पंजाब कृषी विद्यापीठानेही गव्हाचे 3 वाण शोधलेत
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पंजाब कृषी विद्यापीठाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी गव्हाच्या तीन नवीन जाती विकसित केल्या असून या जाती शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या गव्हाच्या तीन जाती देखील गहू उत्पादक शेतकरी बांधवांचे उत्पादन वाढवण्यासाठी फायद्याच्या राहणार आहेत. यामध्ये पीबीडब्ल्यू 826, पीबीडब्ल्यू 872 आणि पीबी 833 या वाणांचा समावेश आहे.
नव्याने विकसित गव्हाची जात आहे अनेक रोगास प्रतिरोधक
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी संशोधन संस्था अल्मोडा यांनी तयार केलेली गव्हाची ही नवीन जात रोगप्रतिरोधक क्षमतांनी परिपूर्ण आहे. यामुळे देशातील गहू उत्पादक शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात बचत होणार आहे. ही जात गव्हात आढळणा-या गंज किंवा रस्ट किंवा तांबेरा रोगाला देखील प्रतिरोधक राहणार आहे.
दुसरीकडे या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळून आले आहे. ज्या अंतर्गत या जातीमध्ये सरासरी 09.07 टक्के प्रथिनांचे प्रमाण नोंदवले गेले आहे. ज्यामध्ये त्याचे धान्य मऊ असते. या सर्व गुणांमुळे ही विविधता बेकरी उत्पादनांसाठी सर्वोत्तम असल्याचे बोलले जात आहे. सहाजिकच त्यामुळे या जातीच्या गव्हाला बाजारात चांगला बाजार भाव मिळणार असल्याचे बोलले जात आहे.