Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासहित देशभरातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील प्रमुख बागायती भागांमध्ये गव्हाची शेती केली जाते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांमध्ये जिथे मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी गव्हाची पेरणी केली जाते.
याची लागवड पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये केली जाते. मात्र ग्लोबल वार्मिंगमुळे तसेच भूजल पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने अलीकडे गहू पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये.
मात्र कृषी संशोधकांनी शेतकऱ्यांच्या या अडचणीवर उपाय काढला आहे. संशोधकांनी गव्हाचे असे एक नवीन वाण विकसित केले आहे जे की कमी पाण्यात दर्जेदार उत्पादन देण्यास सक्षम राहणार आहे.
दरम्यान आज आपण कृषी संशोधकांनी अलीकडेच विकसित केलेल्या या नवीन वाणाची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणते आहे हे वाण ?
सीएसए एग्रीकल्चरल यूनिवर्सिटीने गव्हाचा हा नवीन वाण तयार केला आहे. हा नवीन वाण K0307 आणि K9162 या दोन जातींपासून तयार करण्यात आला आहे. या नव्याने विकसित झालेल्या गव्हाच्या जातीला K1317 चे नाव देण्यात आले आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाची ही नवीन जात 120 ते 130 दिवसात काढणीसाठी तयार होते. विशेष म्हणजे गव्हाच्या या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळत आहे.
या नव्याने विकसित झालेल्या वाणातून शेतकऱ्यांना 5.5 टन प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. सध्या गव्हाची राष्ट्रीय सरासरी उत्पादकता 3.5 टन प्रती हेक्टर एवढी आहे. अर्थातच नव्याने विकसित झालेला हा वाद दुपट उत्पादन देतो.
यामुळे या पिकाची लागवड करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार अशी आशा आहे. या जातीच्या गहू पिकाला सामान्य गव्हाच्या तुलनेत तब्बल 70 टक्के कमी पाणी लागते.
फक्त दोनदा पाणी भरले तरीदेखील या जातीच्या गव्हापासून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. कमी नायट्रोजन वापरले तरी देखील यातून चांगले उत्पादन मिळते.
विशेष म्हणजे अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा देखील या जातीच्या गव्हाच्या पिकावर विपरीत परिणाम पाहायला मिळत नाही. यामुळे या जातीपासून उत्पादन खर्च कमी आणि अधिक उत्पादन मिळणार असा दावा केला जातोय.