Wheat Farming : देशात सध्या खरीप हंगाम प्रगतीपथावर आहे. येत्या काही दिवसात देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. खरं पाहता देशातील बहुतांशी भागात रब्बी हंगामाला सुरुवात देखील झाली आहे. गहू हे देखील रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे.
या पिकाची राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. राज्यातील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी पसात म्हणजे उशिरा पेरणी साठी उपयुक्त असलेल्या गव्हाच्या एका वाणाविषयी (Wheat Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत.
DBW 107 या गव्हाच्या जाती विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. DBW 107 हे गव्हाचं वाण पसात म्हणजे उशिरा पेरणीसाठी योग्य असल्याचा दावा आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या जातीच्या काही विशेषता थोडक्यात.
DBW 107 या गव्हाच्या जातीची उत्पादन क्षमता किती आहे बर
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, DBW 107 ही गव्हाच्या उत्कृष्ट वाणांपैकी एक आहे. या जातीची गव्हाची पेरणी उशिरा केली जात आहे. जर आपण आकडेवारी पाहिली तर त्याची उत्पादन क्षमता 68.7 क्विंटल/हेक्टर आहे.
तसेच, त्याची बियाणे उत्पादन क्षमता 41.30 क्विंटल/हेक्टर आहे. DBW 107 ही जात पेरणीनंतर फक्त 109 दिवसांनी पिकण्यासाठी तयार होते आणि त्याची झाडाची उंची – 89 सेमी (86-91 सेमी) असते.
DBW 107 गहूच्या जातीची विशेषता
DBW 107 गव्हाच्या धान्याचे वजन 39.09 ग्रॅम आहे, त्याचा रंग अंबर आहे आणि त्याचा आकार आयताकृती आहे. DBW 107 तपकिरी तांबेरा रोग (ACl-3.7) आणि लीफ ब्लाइट (सरासरी स्कोअर: नैसर्गिक मध्ये 24, कृत्रिम मध्ये 36) अत्यंत प्रतिरोधक आहे. या जातीमध्ये 12.8 टक्के प्रथिनांसह चपाती आणि रोटीचे चांगले गुणधर्म आहेत.
DBW 107 गव्हामध्ये 44.6 ppm Fe, 35.7 ppm Zn आणि 4.15 ppm पिवळे रंगद्रव्य आहे. थोडक्यात, DBW 107 मध्ये गुणधर्मांचे चांगले संयोजन आहे ज्यामुळे ते भात-गहू, बटाटा-गहू आणि वाटाणा-गहू पीक रोटेशनसाठी योग्य बनते. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होतो.