Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण देशात लागवड केली जात आहे. आपल्या राज्यातही गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. यावर्षी मात्र मानसून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्याने गहू लागवडीखालील क्षेत्र किंचित कमी होईल असा अंदाज आहे.
पण असे असले तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून यंदाही मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी होण्याची शक्यता आहे. खरंतर गव्हाची पेरणी ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि उशिरा पेरणी डिसेंबर महिन्यापर्यंत केली जात असते.
याअनुसार सध्या रब्बी हंगामातील गहू पिकाची पेरणी सुरू आहे. शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी आपल्या परिवारासमवेत शत शिवारात धावपळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. खरंतर, जगातील एकूण गहू उत्पादनाचा लेखाजोखा बघितला असता भारतात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.
विशेष म्हणजे गव्हाची खपत देखील आपल्या देशात सर्वाधिक आहे. हेच कारण आहे की शेतकरी बांधवांना गव्हाच्या उत्पादनासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच शेतकरी बांधवांना गव्हाच्या पिकातून अधिकचे उत्पादन मिळावे यासाठी देशातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून गव्हाच्या सुधारित जाती विकसित केल्या जात आहेत.
यावर्षी देखील भारतीय शास्त्रज्ञांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी गव्हाच्या नवीन 7 जाती तयार केल्या आहेत. महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर येथे भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था, कर्नालच्या 62 व्या कार्यशाळेत या जातींची घोषणा करण्यात आली आहे.
गव्हाच्या नावाने विकसित झालेल्या जाती
HD 3386 : भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा दिल्ली यांनी यावर्षी एचडी 3386 या गव्हाच्या नवीन वाणाचा शोध लावला आहे. गव्हाचा हा वाण वेळेवर पेरणी करण्यासाठी आणि बागायती भागासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. हा वाण उत्तर-पश्चिम मैदानी भागासाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
WH 1402 : मर्यादित सिंचन परिस्थितीत तग धरणारा हा अलीकडेच विकसित झालेला वाण आहे. हिसार कृषी विद्यापीठाने या वाणाची निर्मिती केली आहे. हा वाण देशातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
एचडी 3388 : गव्हाचा हा वाण ईशान्येकडील मैदानी भागासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. हा वाण बागायती भागासाठी आणि वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञांनी या वाणाची निर्मिती केली आहे.
डीबीडब्ल्यू 327 : गव्हाचा हा वाण अलीकडेच विकसित झाला आहे. भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था, कर्नाल यांनी ही जात तयार केली आहे. या जातीला करणं शिवानी म्हणून ओळखले जात आहे. हवामान मर्यादित सिंचन परिस्थिती शिफारशीत केल्यात आला आहे.
DBW 359: गव्हाचा हा वाण देखील भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था कर्नाल यांनी विकसित केला आहे. हा वाण मर्यादित सिंचन परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरणार असे सांगितले जात आहे.
याशिवाय, DBW-370, DBW-371, DBW-372, DBW-316 आणि DBW-55 या गव्हाच्या जाती देखील आगामी वर्षात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना आता गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.