Wheat Farming : गव्हाची लागवड रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यंदा देखील रब्बी हंगामामध्ये गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय राहिले आहे. आपल्या राज्यात देखील या प्रमुख बागायती पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती.
शेतकरी बांधव या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळावे यासाठी याच्या सुधारित जातींची पेरणी करत असतात.
दरम्यान आज आपण रब्बी हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना कोणत्या जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
कोणत्या जातीपासून मिळाले विक्रमी उत्पादन
GW 513 : देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यंदा देखील या वाणाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. गव्हाची ही जात चपाती आणि बिस्कीटसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
गव्हाचा हा वाण 105 ते 117 दिवसात परिपक्व होतो. या जातीपासून हेक्टरी 85 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.
पुसा ओजस्वी : गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळते. या जातीपासून शेतकऱ्यांना 75 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. या जातीचे पीक 115 ते 120 दिवसात काढणीसाठी तयार होते.
करणं वैष्णवी : यंदा या जातीची देखील मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. या जातीपासून ऍव्हरेज 81 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.
विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांना या जातीपासून 90 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा होत आहे. गव्हाची ही सुधारित जात सरासरी 145 दिवसात परिपक्व होते.
या जातींची लागवडही वाढली
रब्बी हंगाम 2023-24 मध्ये MACS 6768, 8850, CG 1036, पुसा बीट 8777 या गव्हाच्या जातीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. विशेष म्हणजे या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले आहे.