Wheat Farming : गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. याची लागवड हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान सह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये गव्हाची लागवड होते.
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी केली जाते. सध्या रब्बी हंगामातील गहू पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी बांधव लगबग करतांना दिसत आहेत. आपल्या परिवारासमवेत सध्या गहू पेरणीसाठी ची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान जर तुम्ही ही यंदाच्या रब्बी हंगामात गहू पेरणी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण गव्हाच्या दोन अशा प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे आज आपण ज्या जातींची माहिती पाहणार आहोत त्या महाराष्ट्रातील हवामानात तग धरणाऱ्यां आहेत. अर्थातच या जाती राज्यातील हवामानात लागवडीसाठी उपयुक्त आहेत.
गव्हाच्या दोन प्रमुख जाती खालील प्रमाणे
गोदावरी NIAW 295 : गोदावरी ही गव्हाची एक प्रमुख जात असून महाराष्ट्रातील हवामानात या जातीपासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळवता येणे शक्य होत आहे. गव्हाच्या या वाणाबाबत बोलायचं झालं तर हा महाराष्ट्रातीलच हवामानात तग धरणारा एक प्रमुख बन्सी वाण आहे. या जातीचा पीक परीपक्व कालावधी हा 110 दिवसांचा असतो.
या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजतेने मिळू शकते. या जातीचा गहू रवा शेवया कुरडया इत्यादीसाठी वापरला जातो. या जातीच्या गव्हाचे दाणे आकाराने मोठे असतात आणि बाजारात याला चांगला भावही मिळतो.
श्रीराम सुपर 111 : श्रीराम सीड्स कंपनीची श्रीराम सुपर 111 ही गव्हाची महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय जात आहे. या जातीची राज्यातील अनेक प्रमुख उत्पादक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. या जातीबाबत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी एकरी 40 किलो बियाणे वापरायला हवेत.
उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर या जातीपासून एकरी 22 ते 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा केला जातो. लांब ओंबी आणि उंची कमी असते.
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये गव्हाची लागवड होते त्या ठिकाणी गव्हाच्या या जातीची पेरणी अवश्य केली जाते. त्यामुळे जर तुम्हीही यंदा गहू लागवड करण्याच्या तयारीत असाल तर या जातीची निवड करू शकता.