Wheat Farming : भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) अंतिम टप्प्यात आला असून आगामी काही दिवसात रब्बी हंगामाला देखील सुरूवात होणार आहे. भारतात रब्बी हंगामात (Rabbi Season) गहू या नगदी पिकाची (Cash Crops) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
आपल्या राज्यातही गव्हाची लागवड (Wheat Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. मित्रांनो खरे पाहता आपल्या देशात गव्हाच्या वेगवेगळ्या सुधारित आणि देशी जातींची (Wheat Variety) लागवड केली जाते. मात्र आज आपण ज्या गव्हाच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत त्या गव्हाला बाजारात सर्वाधिक मागणी असते.
विशेष म्हणजे या गव्हाला चांगला बाजार भाव देखील मिळत असतो. मात्र महाराष्ट्रात या गव्हाची लागवड फक्त प्रायोगिक तत्त्वावरच झालेली बघायला मिळते. या गव्हाची लागवड विशेषता मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. गव्हाचे हे देशी वाण शेतकऱ्यांना लखपती बनवण्याचे देखील सामर्थ्य ठेवते.
मित्रांनो देशात उपलब्ध असलेल्या गव्हाच्या सर्व सुधारित जाती मध्ये शरबती गहू हे सर्वात प्रीमियम वाण आहे. मध्यप्रदेश राज्यातील सीहोर भागात शरबती गव्हाचे पीक सर्वाधिक पाहायला मिळते.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सीहोर प्रदेशात काळी आणि गाळाची सुपीक जमीन आढळते जी की शरबती गव्हाच्या शेतीसाठी सर्वोत्कृष्ट आहे शरबती गव्हाला त्याच्या सोनेरी रंगामुळे सोनेरी धान्य असेही म्हणतात. शरबती गहू गोल आणि पूर्ण चमकदार असतो, ही चमक रासायनिक पोटास गुणधर्मामुळे असते आणि ती तळहातावर जड वाटते आणि त्याची चव गोड असते, म्हणून त्याचे नाव शरबती पडले असल्याचे जाणकार नमूद करतात.
शरबती गव्हाची वैशिष्ट्ये
शरबती गहू गोलाकार आणि पूर्णपणे चमकदार आहे, ही चमक रासायनिक पोटास गुणधर्मामुळे आहे. हा गहू सामान्य गव्हापेक्षा गोड आणि चविष्ट असतो.
C-306 गव्हाचे दाणे जास्त पोटॅश सामग्रीमुळे घन आणि जड असतात. त्यामुळे तळहातात ठेवल्यावर दाणे जड वाटतात.
C-306 (शरबती) गव्हात ग्लुकोज, साखर, सुक्रोजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बनवलेल्या रोट्या मऊ आणि ताज्या राहतात.
शरबती गव्हावर रासायनिक औषधांचा वाईट परिणाम होतो आणि उत्पादनही खूप कमी होते. या कारणास्तव त्याची लागवड नैसर्गिकरित्या केली जाते.
कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक रासायनिक युरिया डीएपी ही लागवड करताना वापरली जात नाही.
शरबती गव्हाचे धान्य 99 टक्के कोरडे आहे कारण ते बहुतांशी बागायत नसलेल्या भागात घेतले जाते.
शरबती गव्हाचे दाणे पूर्णपणे गोलाकार आणि दिसायला सोनेरी पांढरे असते.
बाजारात उपलब्ध असलेले महागडे गिरणीचे पीठ हे बहुतांशी शरबती गव्हाचे असते.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार शरबती गहू हा बाजारात पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जाऊ शकतो. सर्वसाधारणपणे शरबती गहू हा 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारात विकला जातो.