Wheat Farming: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी करू लागले आहेत. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांची खरीप हंगामातील पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण रब्बी हंगामातील (Rabbi Season) गव्हाच्या पिकाविषयीं (Wheat Crop) जाणून घेणार आहोत. खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर लगेचच रब्बी हंगाम सुरू होतो अशा परिस्थितीत आज आपण रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिकाविषयीं जाणून घेणार आहोत.
जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा रब्बी हंगामात फायदा होईल. मित्रांनो खरं पाहता आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. अशा परिस्थितीत आज आपण काळ्या गव्हाच्या शेतीविषयी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो अलीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात काळ्या भाताची तसेच काळ्या गव्हाची शेती करू लागले आहेत. आपल्या राज्यात याची शेती (Farming) अजून तरी बघायला मिळत नाही मात्र येत्या काळात निश्चितच काळ्या गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकते. काळ्या गव्हाची शेती (Black Wheat Farming) शेतकऱ्यांसाठी मोठी फायद्याची ठरत आहे.
कारण की, काळा गहू हा सामान्य गव्हापेक्षा खूपचं अधिक किमतीत विकला जात आहे. काळा गहू हा सामान्य गव्हापेक्षा चार पट अधिक किमतीत विकला जातो. यामुळे याची शेती शेतकऱ्यांना सामान्य गव्हाच्या शेतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकते. जाणकार लोकांच्या मते काळा गहू बाजारात आठ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जातो.
तर सामान्य गहू हा केवळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जातो. म्हणजेच काळ्या गव्हाची शेती ही निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणारी आहे. मात्र असे असले तरी काळ्या गव्हाच्या शेतीत उत्पादन खर्च अधिक करावा लागतो. परंतु काळ्या गव्हाला अधिक दर मिळत असल्याने उत्पादन खर्च काढून देखील शेतकऱ्यांना चांगला बक्कळ नफा राहतो.
केव्हा केली जाते काळ्या गव्हाची पेरणी
मित्रांनो इतर गव्हाप्रमाणे काळ्या गव्हाची लागवड देखील रब्बी हंगामात केली जाते. कृषी तज्ञ नोव्हेंबर महिना या गव्हाच्या पेरणीसाठी चांगला असल्याचे सांगत असतात. काळ्या गव्हाच्या पेरणीसाठी ओलावा खूप महत्वाचा असतो. यामुळे नोव्हेंबरनंतर काळ्या गव्हाची पेरणी केल्यास उत्पादनात घट होत असल्याची माहिती तज्ञ देत असतात.
सामान्य गव्हापेक्षा कसा वेगळा आहे
काळ्या गव्हात अँथोसायनिन रंगद्रव्य जास्त असते. यामुळे तो काळा दिसतो. पांढऱ्या गव्हात अँथोसायनिनचे प्रमाण 5 ते 15 पीपीएम असते तर काळ्या गव्हात 40 ते 140 पीपीएम असते. काळ्या गव्हामध्ये अँथ्रोसायनिन (एक नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट आणि प्रतिजैविक) मुबलक प्रमाणात आढळते, जे हृदयविकाराचा झटका, कर्करोग, मधुमेह, मानसिक ताण, गुडघेदुखी, अशक्तपणा यासारख्या आजारांवर खूप प्रभावी आहे. यामुळे या गव्हाची खपत दिवसेंदिवस वाढत आहे.
काळ्या गव्हाचे फायदे
काळ्या गव्हामध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात, त्यामुळे त्याचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. त्यात लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. काळा गहू कर्करोग, रक्तदाब, लठ्ठपणा आणि साखरेच्या रुग्णांसाठी वरदान मानले जाते. याशिवाय ते खाल्ल्याने रक्ताची कमतरता आणि दृष्टीही वाढते.
कमाई
काळ्या गव्हाचे उत्पादनही सामान्य गव्हाच्या तुलनेत चांगले आहे. एका अभ्यासानुसार 1 बिघामध्ये 1000 ते 1200 किलो काळा गहू तयार होऊ शकतो. एक क्विंटल गव्हाचा भाव 8000 रुपये असेल तर सुमारे 9 लाख रुपये उत्पन्न 1 बिघा क्षेत्रात मिळू शकते.