Wheat Farming : गव्हाच्या पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन करताना विशेष काळजी घ्यायला हवी. गहू हे हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे आणि डिसेंबर हा महिना या पिकासाठी अधिक महत्त्वाचा असतो. कारण की डिसेंबरच्या महिन्यात गव्हाच्या पिकाला पहिले पाणी दिले जाते.
नोव्हेंबरमध्ये पेरणी झाल्यानंतर डिसेंबरच्या महिन्यात गव्हाच्या पिकाला पहिले पाणी देतात. हा महिना या पिकासाठी महत्त्वाचा राहतो. खरे तर गहू हे एक प्रमुख पीक आहे मात्र अनेक शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
अनेकांच्या माध्यमातून आता आधी सारखे गव्हातून उत्पादन मिळत नाही अशी ओरड केली जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या पिकातून विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवे याबाबत माहिती पाहणार आहोत.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकातून उत्पादन वाढवण्यासाठी युरिया सोबतच एका ऑरगॅनिक खताचा देखील वापर करायला हवा. आता आपण युरिया सोबत नेमके कोणते ऑरगॅनिक खत वापरायला हवे याबाबत माहिती पाहणार आहोत.
या खताचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार
गहू पिकामध्ये सिंचनाची भूमिका महत्त्वाची असते. गहू पिकाला पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी द्यावे हे लक्षात ठेवा. असे केल्याने गव्हाच्या पिकात ओंबी लवकर निघते. पण शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. अतिसिंचन होत असले तर ताबडतोब पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
तज्ञ सांगतात की कोणत्याही पिकाच्या वाढीमध्ये पोषक तत्वे महत्त्वाची भूमिका बजावतात. पाणी दिल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी अगदीच वापसा कंडिशन मध्ये नायट्रोजन म्हणजेच युरियाची फवारणी करावी. 1 एकर गहू पिकावर 40 ते 50 किलो युरियाची फवारणी करावी.
युरियामध्ये आढळणाऱ्या नायट्रोजनमुळे झाडे हिरवीगार होतात आणि ओंब्या झपाट्याने येऊ लागतात. युरियासोबतच बायोविटा या जैविक खताचाही शेतकरी वापर करू शकतात. शेतकरी एक एकर पिकासाठी ५ किलो बायोविटा युरिया मिसळून फवारणी करू शकतात.
बायोविटामध्ये सल्फर, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, कॅल्शियम, कोबाल्ट आणि झिंक यासारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. बायोविटा वापरून, जमिनीत आधीपासूनच असलेले पोषक घटक देखील सक्रिय होतात. झाडे वेगाने वाढतात. ओंब्यांची संख्याही झपाट्याने वाढते.
शेतकरी गहू पिकात नायट्रोजनसोबत बायोव्हिटा वापरत असतील तर त्यांनी वेळेचेही भान ठेवावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांगले परिणाम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नत्र व बायोविटा यांची संध्याकाळी फवारणी करावी. असे केल्याने पीक जास्तीत जास्त पोषक द्रव्ये शोषून घेते अन उत्पादनात भरीव वाढ होत असते.