Wheat Farming : तुम्हीही रब्बी हंगामात गहू लागवड करणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करून तुम्हाला जर विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्ही गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी करायला हवी.
दरम्यान आज आपण महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त असणाऱ्या गव्हाच्या अशाच चार जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
गव्हाच्या टॉप चार जाती
बायो सीड 2005 : बायो सीड कंपनीचे 2005 हे वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील हवामान या जातीच्या गव्हासाठी विशेष अनुकूल असल्याचा दावा केला जातो. या जातीच्या पिकाची उंची कमी असते.
ओंबी लांब आणि दाणे टपोरे असतात. चपातीसाठी हा गहू उत्तम आहे, खायाला खूपच चविष्ट आहे. यामुळे बाजारात याला चांगला दर मिळतो. जर तुम्ही गव्हाच्या या जातीची पेरणी करत असाल तर एकरी 40 किलो बियाणे पेरावे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
या जातीची पेरणी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात केल्यानंतर अव्यय 110 ते 120 दिवसात या जातीचे पीक काढण्यासाठी तयार होते. गव्हाच्या या पिकाला चार ते सहा वेळा पाणी द्यावे लागणार आहे.
Mahyco मुकुट : मायको सीड्स कंपनीचे मुकुट हे गव्हाचे हायब्रीड वाण असून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात उत्पादित होणारे वाण म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांमध्ये गव्हाचा हा वाण खूपच लोकप्रिय आहे.
याच्या विशेषतांबाबत बोलायचं झालं तर फुटवा अधिक असतो, पिकाची उंची ही योगी 110 ते 117cm दरम्यान असते, विविध रोगांमध्ये रोगप्रतिकारक आहे, तांबेरा रोगांमध्ये देखील रोगप्रतिकारक आढळून आला आहे, उच्च उत्पादन देणारा आणि टपोरे दाणे असणारा हा वाण आहे.
चपातीसाठी खूपच उत्कृष्ट वाण असून बाजारात या जातीच्या गव्हाला मोठी मागणी असते. यामुळे याला चांगला दरही मिळतो. उत्पादनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकरी 25 ते 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजतेने मिळू शकते. जर तुम्हाला याची पेरणी करायची असेल तर तुम्ही एकरी 40 किलो एवढे बियाण्याचे प्रमाण ठेवायला हवे.
श्रीराम सुपर 111 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये गव्हाची ही जात खूपच लोकप्रिय आहे. लांब ओंम्बी, उंची कमी आणि एकरी 22 ते 30 क्विंटल पर्यंतचा उतारा देण्याची क्षमता यामुळे ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
जर तुम्हाला या जातीची पेरणी करायची असेल तर तुम्ही एकरी 40 किलो बियाणे वापरायला हवे. या जातीबाबत बोलायचं झालं तर ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक असून उच्च उत्पादन देण्यासोबतच या जातीच्या गव्हाचा दर्जा देखील खूपच चांगला असतो.
बाजारात याला चांगली मागणी असते. जर तुम्हाला व्यावसायिक शेती करायची असेल तर तुम्ही नक्कीच या जातीच्या गव्हाची लागवड करू शकता.
श्रीराम सुपर 303 : श्रीराम सीड्स कंपनीचे श्रीराम सुपर 303 हे गव्हाचे एक सुधारित वाण आहे. चपातीसाठी हा वाण उत्कृष्ट असल्याचे आढळले आहे. या जातीपासून शेतकरी बांधव एकरी 25 ते 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवू शकतात.
याचा पीक परिपक्व कालावधी हा सामान्यच आहे म्हणजेच 110 ते 120 दिवसांच्या काळात या जातीचे पीक परिपक्व होत असते. या जातीचा गहू हा चपातीसाठी देखील उत्कृष्ट आहे. साहजिकच बाजारातही याला चांगली मागणी राहते आणि यामुळे या जातीची लागवड करून शेतकऱ्यांना अधिकची कमाई करता येणे शक्य होत आहे.