Wheat Farming : गहू हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. या पिकाची रब्बी हंगामात लागवड केली जाते. याची लागवड महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी होते.
अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या तीन प्रमुख जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील हवामानात लागवडीसाठी उपयुक्त अशा गव्हाच्या जातीची आता आपण माहिती पाहणार आहोत. गव्हाच्या सुधारित जाती खालील प्रमाणे.
त्र्यंबक NIAW 301 : गव्हाच्या या जातीची महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये लागवड केली जाते. राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा एक ते पंधरा दिवसांचा आहे.
मध्यम कालावधीत काढणीसाठी तयार होणारा गव्हाचा हा वाण एक सरबती प्रकारातील वाण आहे. गव्हाची ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक आहे.
चपातीसाठी या जातीचा गहू सर्वोत्कृष्ट आहे. या जातीच्या गव्हाचे दाणे हे जाड असतात. या जातीपासून एकरी 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये गव्हाची ही जात विशेष लोकप्रिय बनली आहे.
2) गोदावरी : NIAW 295 म्हणजेच गोदावरी हा देखील गव्हाचा एक सुधारित प्रकार आहे. या जातीची लागवड राज्यातील अनेक प्रमुख गहू उत्पादक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. गव्हाच्या या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा त्र्यंबक या जातीपेक्षा कमी आहे.
या जातीचे पीक अव्यय 110 दिवसात परिपक्व होते. मात्र गव्हाचा हा एक बन्सी वाण आहे. तांबेरा रोगास या जातीचे पीक प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे.
या जातीच्या गावापासून रवा शेवया कुरडया तयार केल्या जाऊ शकतात. या जातीचे गव्हाचे दाणे हे मोठे असतात. या जातीपासूनही शेतकऱ्यांना 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जात आहे.
3) तपोवन : NIAW 917 अर्थातच तपोवन या जातीच्या गव्हाची राज्यातील अनेक भागांमध्ये शेती केली जाते. या जातीपासून शेतकऱ्यांना 18 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीचे पीक 115 दिवसात तयार होते.
बागायती भागात पेरणीसाठी या जातीची शिफारस केली जाते. बागायती भागात वेळेवर पेरणी करण्यासाठी गव्हाचा हा एक उत्कृष्ट सरबती वान आहे. या जातीचा गहू चपातीसाठी सर्वोत्कृष्ट असतो आणि या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.