Wheat Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सातत्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पादन मिळत नाहीये. दुसरीकडे, उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही ही वास्तविकता आहे.
मात्र या साऱ्या संकटांनाही बळीराजा शह देतांना दिसत आहे. शेतकरी बांधव नवनवीन प्रयोगातून शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. दरम्यान असाच एक प्रयोग समोर आला आहे तो मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातुन. मराठवाडा हा दुष्काळासाठी खूपच कूख्यात आहे.
मराठवाड्याला दुष्काळामुळे ओळखले जाते. पण याच दुष्काळी पट्ट्यात येथील शेतकऱ्यांनी आता शेतीत नवीन क्रांती घडवून आणली आहे. येथील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणत आहेत. जालना जिल्ह्यातही असाच एक नवीन प्रयोग पाहायला मिळाला असून याची सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे.
वास्तविक, येथील बागायती भागात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पण जिल्ह्यातील अंबड येथे वास्तव्यास असलेल्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने नेहमीच्या सामान्य गव्हाची लागवड करण्याऐवजी चक्क अमेरिकन गव्हाची लागवड यशस्वी करून दाखवली आहे.
या गव्हाच्या पिकातून या सदर शेतकऱ्याला आता विक्रमी उत्पादन मिळणार आहे. या शेतकऱ्याने लावलेल्या गव्हाच्या पिकाची लोंबी तब्बल नऊ ते बारा इंच लांब आहे. आपल्याकडील सामान्य गव्हाच्या लोंब्या या पाच ते सहा इंच लांब असतात.
पण या अमेरिकन गव्हाच्या वरायटीची लोंबी सामान्य गव्हाच्या तुलनेत खूपच लांब आहे. विशेष म्हणजे या अमेरिकन व्हरायटीचे दाणे देखील सामान्य दाण्याच्या तुलनेत अधिक जाड आणि वजनदार आढळले आहेत. त्यामुळे सध्या या शेतकऱ्याची संपूर्ण राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे.
पापालाल भिकूलाल लाहोटी यांनी हा अमेरिकन गहू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पापालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मध्यप्रदेश राज्यातून आपल्या नातेवाईकाकडून या जातीचे बियाणे मागवले. त्यांनी पारनेर शिवारात असलेल्या त्यांच्या शेतजमिनीत या जातीच्या गव्हाची लागवड केली आहे.
त्यांनी गेल्या वर्षी या जातीचे दोन किलो गव्हाचे बियाणे आपल्या नातेवाईकाकडून मागवले. याची त्यांनी वीस गुंठे जमिनीवर टोकन पद्धतीने लागवड केली. यातून त्यांना 15 क्विंटल 85 किलो एवढे उत्पादन मिळाले. यामुळे त्यांनी यंदा तब्बल चार एकर जमिनीवर या जातीच्या गव्हाची लागवड केली. टोकन पद्धतीने या जातीच्या गव्हाचे बियाणे पेरले गेले आहे.
या गव्हाच्या पिकाला नऊ ते बारा इंची च्या ओंब्या पाहायाला मिळत आहेत. या गहू पिकाला त्यांनी एकदा तणनाशकाची फवारणी केली आहे आणि दोनदा डी कंपोजर फवारले आहे. या गव्हाच्या पिकाला सामान्य गव्हापेक्षा अधिकचे पाणी लागते. मात्र या चार एकर गहू लागवडीतून त्यांना शंभर ते 110 क्विंटल एवढे उत्पादन होईल अशी आशा आहे.
म्हणजेच यंदा देखील एकरी जवळपास 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन त्यांना मिळणार आहे. एकीकडे शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी अशा असंख्य संकटांमुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये तर दुसरीकडे पापालाल यांनी नवीन प्रयोगातून गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवले आहे.