Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक. या पिकाची रब्बी हंगामात शेती केली जाते. यंदाच्या रब्बी हंगामात देखील गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस असताना देखील भारतात गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय होते.
यंदा तर मान्सूनच्या आत्तापर्यंतच्या कालावधीत राज्यासह भारतात चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात तर मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे यंदा गहू लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे.
दरम्यान जर तुम्ही यंदाच्या रब्बी हंगामात गहू लागवड करणारा असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गहू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे अनुषंगाने देशातील कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाची नवीन जात विकसित केली आहे.
अलीकडेच, भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी एचडी-३३८५ ही गव्हाची नवीन जात विकसित केली आहे, जी शेतकऱ्यांना बंपर उत्पादन देण्यासोबतच रोग प्रतिरोधक देखील आहे. यामुळे आज आपण गव्हाच्या याच सुधारित जातीचे अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एचडी 3385 गव्हाच्या विशेषता
कृषी शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी बांधव सहसा नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करत असतात. काही भागात शेतकरी बांधव ऑक्टोबर महिन्यातच गव्हाची लागवड करतात.
जर तुम्ही ही यंदा कहू लागवड करू इच्छित असाल तर एचडी 3385 ही अलीकडेच विकसित झालेली गव्हाची जात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या जातीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना उच्च उत्पादन मिळणार आहे.
ही जात रोगप्रतिरोधक आहे. या जातीवर विविध कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव खूपच कमी प्रमाणात होतो. यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळते.
या जातीची जर शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली तर त्यांना हेक्टरी 75 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते. म्हणजेच अडीच एकर जमिनीतून शेतकऱ्यांना 75 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
महत्त्वाचे म्हणजे या जातीच्या गव्हाचे बियाणे शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात या जातीचे बियाणे पेरुन शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येणार आहे.