Weather Update : राज्यात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले. राज्याच्या मुख्य भूमीत अर्थातच तळकोकणात मान्सून पोहोचला आहे. सध्या मान्सून राज्यातील तळकोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात आहे. तळकोकणातील सिंधुदुर्गमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मान्सून मुक्कामाला आहे. तेथून पुढे प्रवासासाठी त्याला पोषक हवामान तयार होत नाहीये.
दरम्यान, येत्या काही तासात मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक हवामान तयार होईल आणि साधारणतः 18 जून ते 21 जून पर्यंत मान्सून मुंबईमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे. तत्पूर्वी मात्र राज्यात पूर्व मोसमी पावसाने उघडीप दिली असल्याने उकाडा वाढला आहे. राज्यात उष्णतेची लाट वाहत आहे. विशेषता विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झाली असून तेथे गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट येत आहे.
हे पण वाचा :- हळद लागवड करताय? मग हळदीच्या सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता एकदा वाचाच !
आज देखील भारतीय हवामान विभागाने विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज व्यक्त केला असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मात्र आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज विदर्भातील काही जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शिवाय कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता आज व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे, ज्या जिल्ह्यात पाऊस पडेल तेथे उकाड्यापासून दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत, आता आपण कोणत्या जिल्ह्यात आज उष्णतेची लाट येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने दिलेली महत्त्वपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- ‘अस’ झालं तरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ! कापसाच्या दरात होणार विक्रमी वाढ, वाचा…
कोणत्या जिल्ह्यात राहणार उष्णतेची लाट
आज 15 जून वार गुरुवार रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असा अंदाज IMD चा आहे.
कोणत्या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा
आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज कोकणात देखील पाऊस पडणार असा अंदाज आहे.
हे पण वाचा :- 800 रुपयाची बियाण्याची बॅग 1600 ला ; तरीही कपाशीच्या ‘या’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती; या वाणाच्या विशेषता तरी काय?