Weather Update : मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी एक मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सूनचे आगमन यंदा वेळेतच होणार अशी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
जस की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या काही दिवसांपासून भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून यंदा केरळमध्ये मान्सून तीन ते चार दिवस उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता.
मात्र आता हवामान विभागाने आपल्या नवीन निष्कर्षात असं नोंदवले आहे की अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे.
म्हणजेच अरबी समुद्रामध्ये तयार होणारे हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात मान्सून आगमनाचे संकेत देत आहेत. निश्चितच ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून उकाड्यापासून हैराण झालेल्या सामान्य जनतेला देखील यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
तत्पूर्वी राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसाचे देखील शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पुढील दोन दिवसात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुंबईसह परिसरात तापमानात घट होईल असा अंदाज व्यक्त केला असून पुढील दोन दिवस मुंबई आणि परिसरात ढगाळ हवामान आणि काही भागात पावसाची शक्यता राहील असा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमानात घट होणार आहे.
याशिवाय मान्सूनपूर्व पाऊस राज्यातील वेगवेगळ्या भागात पडणार आहे. यात विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे, तसेच कोकणात देखील आगामी काही दिवस ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता मान्सूनचे केरळमध्ये एक जूनला आगमन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, बाजरीच्या ‘या’ जातीची लागवड करा, दर्जेदार उत्पादन मिळणार, वाचा याच्या विशेषता
केरळमध्ये मान्सून वेळेतच दाखल होणार असल्याने महाराष्ट्रात देखील मान्सूनचे आगमन वेळेत होणार आहे. तळ कोकणात मान्सूनचे आगमन सात जूनला होते यानंतर जवळपास पाच ते सहा दिवसात मान्सून मुंबईमध्ये पोहोचतो आणि मग हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर मानसून विस्तारत असतो.
यंदा देखील असच होणार असून सात जूनला मान्सून राज्यात दाखल होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे मान्सून आगमनाची तारीख जवळ येत असून आता नागरिकांना उकाड्या पासून दिलासा मिळणार आहे.
शिवाय यामुळे शेती कामांची लगबग देखील वाढणार आहे. निश्चितच भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सिद्ध होणार आहे.
हे पण वाचा :- मराठवाड्यातील शेतकऱ्याचा सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी; 2 एकरात मिळवले 4 लाखाचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा