Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान माजवला आहे. वादळी वारा, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, गारपीट यामुळे शेतकरी बांधवांची शेती पिके भुईसपाट झाली आहेत. रब्बी हंगामातील ऐन काढणीला आलेल्या पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विज पडण्याच्या घटना महाराष्ट्रातल्या यामुळे जीवितहानी देखील झाली आहे.
नासिक आणि भंडारा या जिल्ह्यात विज पडल्याने पाच शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. निश्चितच या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान आज राज्यात बहुतांशी जिल्ह्यात पावसाची उघडीप बसल्याचे चित्र आहे. सकाळपासून हवामान कोरडे आहे यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलल आहे. शेतकरी बांधवांना आता आपल्या शेतीची कामे करताना आहेत.
हे पण वाचा :- पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या ‘इतक्या’ रिक्त जागांसाठी भरती सुरू; ऑफलाइन पद्धतीने ‘या’ ठिकाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
दरम्यान भारतीय हवामान विभागाने विदर्भ वगळता राज्यात आज कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज 20 मार्च रोजी मात्र विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. अर्थातच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पण मुख्यतः कोरडे हवामान राहणार असल्याने याचा निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विदर्भात मात्र आज पावसाची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याच्या आवाहन केले जात आहे.
हे पण वाचा :- एप्रिल महिन्यात कापूस दर वाढीची शक्यता; किती वाढणार भाव? पहा कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने आज सोमवारी विदर्भाच्या काही भागात विजाच्या कडकडाटासह अन मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारा अन विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून या संबंधित जिल्ह्याना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! देशातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये; कोणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर