Weather Update: जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र पावसाचा (Rain) त्राहिमाम् बघायला मिळाला होता. मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या चरणातील पाऊस (Monsoon News) शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात देखील राज्यात सर्वत्र पावसाची (Rain Alert) हजेरी राहिली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
शिवाय अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता पावसाचा जोर ओसरला असून राज्यातील काही विभाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र असे असले तरी राज्यात श्रावण सरींची बरसात कायम राहणार आहे.
आज भंडारा, चंद्रपुर, गढ़चिरौली, गोंदिया, नागपुर, वर्धा, नांदेड़, लातूर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते उद्या देखील राज्यात (Maharashtra Weather Update) पावसाची शक्यता आहे.
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मित्रांनो उद्या अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
याशिवाय उद्या गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. निश्चितच राज्यातील काही भागात पावसाची उघडीप असली तरीदेखील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून केले गेले आहे.
सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. यामुळे खरिपातील सोयाबीन कापूस मका या पिकांवर रोगराई चे सावट आहे. काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली आहेत.
दरम्यान राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली असल्याने संबंधित धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यामुळे नदीकाठी वसलेल्या गावकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून अनेक ठिकाणी नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर देखील केले जात आहे. एकंदरीत दुसऱ्या चरणातील मान्सूनच्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.