Weather Update: भारताच्या अनेक भागात मुसळधार पावसाची (Rain) शक्यता आहे. आपल्या हवामान बुलेटिनमध्ये, IMD ने म्हटले आहे की, “12 आणि 14 ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिल्ली शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये पुढील पाच दिवस बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Monsoon News) इशारा देण्यात आला आहे. झारखंडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Monsoon) तापमानात घट झाली आहे.
यमुनेतील पूरस्थिती
दिल्लीत मुसळधार पावसामुळे (Monsoon Update) राष्ट्रीय राजधानीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी धोक्याची पातळी 205.33 मीटर ओलांडली आहे. पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडल्याने सखल भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन योजना तयार करत आहे. दिल्ली पूर नियंत्रण कक्षाने सांगितले की, शुक्रवारी दुपारी 4 वाजता यमुना नदीची पाणी पातळी 205.38 मीटरवर पोहोचली.
झारखंडमधील या जिल्ह्यांमध्ये पाऊस
झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाच्या (IMD) रांची, पूर्व सिंगभूम, गुमला, हजारीबाग, जामतारा, सेराईकेला खरसावन, सिमडेगा. पुढील एक ते तीन तास पश्चिम सिंगभूम जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजधानी मुंबईचा हवामान अंदाज (Mumbai Weather Update)
शुक्रवारी सकाळी मुंबईच्या बहुतांश भागात हलका पाऊस झाला तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस (Maharashtra Weather Update) झाला. मात्र, मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अंदाजानुसार, वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास पासून ते 60 किमी प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने मुंबई वासियांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील यावेळी केले आहे.