Weather Update : भारतातील बहुतांशी भागात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. राज्यात देखील पावसाला आता सुरुवात झाली आहे. खरं पाहता मान्सून (Monsoon News) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार, 8, 9 सप्टेंबरला कोस्टल आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस (Monsoon) आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे, तर तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) इशारा देण्यात आला आहे.
त्याचवेळी, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ आणि माहेमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. रायलसीमा येथे 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
उत्तर कर्नाटकात 6,8 आणि 9 सप्टेंबरला आणि लक्षद्वीपमध्ये 6-8 सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, 6 सप्टेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. पूर्व मध्य प्रदेशात 6 आणि 9 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार आहे.
ओडिशामध्ये 6 ते 9 सप्टेंबर, मराठवाड्यात 5, 8 आणि 9 सप्टेंबर, कोकण आणि गोवा, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वादळाची शक्यता आहे. झारखंड आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये 9 सप्टेंबर आणि छत्तीसगडमध्ये पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात 6 ते 8 सप्टेंबर, नागालँड, मणिपुराण मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 6 सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडणार आहे.
या महिन्यात मान्सून कसा असेल?
सप्टेंबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्यपेक्षा कमी पाऊस फक्त ईशान्य भारताच्या काही भागात आणि पूर्व आणि वायव्य भारताच्या काही भागात होऊ शकतो. सप्टेंबर महिन्याचा अंदाज जाहीर करताना हवामान खात्याने सांगितले की, या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, बहुतांश भागात कमाल तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहू शकते. पूर्व आणि उत्तर पूर्व, मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारताच्या काही भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.