Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकतेच 30 आणि 31 मार्च रोजी राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला होता. हवामान विभागाचा हा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी का होईना अवकाळी पावसाची हजेरी लागली. यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले.
आधीच कोसळलेल्या पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या काढणी योग्य शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान काल अन परवा झालेल्या पावसाने पुन्हा एकदा या पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान एप्रिल महिन्यात एक एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.
हे पण वाचा :- नांदेडच्या शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग! लिंबाच्या या जातीची लागवड केली; लाखोंची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा
भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक एप्रिल ते पाच एप्रिल महाराष्ट्रात कोरडा हवामान राहील. मात्र तदनंतर राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. IMD नुसार, 6 एप्रिल 2023 रोजी अर्थातच गुरुवार पासून अवकाळी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि 9 एप्रिल 2023 पर्यंत म्हणजेच रविवार पर्यंत पावसाची शक्यता कायम राहील असा अंदाज आहे. या कालावधीमध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाडा मध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार आहे. निश्चितच हवामान विभागाचा हा अंदाज पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नये असा सल्ला दिला आहे.
हे पण वाचा :- ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ सागरी मार्गाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएची परवानगी, ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, पहा….
तसेच या कालावधीमध्ये राज्यातील काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पाच एप्रिल पर्यंत राज्यात कोरड हवामान राहणार असल्याने शेतकऱ्यांनी काढणी योग्य पिकांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी असे देखील त्यांनी नमूद केल आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा एप्रिल ते नऊ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे.
तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, जालना, नांदेड, बीड, परभणी, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, वर्धा, नागपूर हे जिल्हे वगळता अमरावती, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा !