Watermelon Farming : अलीकडे आपण अनेकांच्या तोंडून शेती आत बट्ट्याचा व्यवसाय बनला असल्याचे ऐकले असेल. काही अंशी हे खरे देखील आहे. नानाविध नैसर्गिक संकटांमुळे आता शेतीचा व्यवसाय खूपच रिस्की बनला आहे.
अहोरात्र काबाडकष्ट करून, लाखो रुपयांचा खर्च करूनही आता शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नाहीये. यामुळे शेती नको रे बाबा असा ओरड नवंयुवकांच्या माध्यमातून केला जात आहे.
यामुळे अनेक जण आता उच्च शिक्षणानंतर नोकरीला अधिक प्राधान्य देत आहेत. पण याला काही नवयुवक अपवाद आहेत. काही नवयुवकांनी चांगले शिक्षण घेतलेले असतानाही शेतीला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे शेती मधून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे.
दरम्यान असेच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे ते सांगली जिल्ह्यातून. जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालयातील बीएससी ऍग्रीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या प्रीतम व प्रथमेश या दोन जिगरबाज मित्रांनी तोडाईवर जमीन घेऊन कलिंगडची यशस्वी लागवड करून दाखवली आहे.
या दोन्ही मित्रांनी शेती वाट्याने घेऊन कलिंगड लागवडीतून लाखो रुपयांचा नफा कमवून दाखवला आहे. या दोघा मित्रांनी कृषी क्षेत्राचे शिक्षण घेत असतानाच प्रात्यक्षिक म्हणून प्रत्यक्ष शेतीत घाम गाळण्याचा निर्णय घेतला.
यासाठी त्यांनी शेती करण्याचे ठरवले. अवघ्या तीन महिन्यात आपल्याला उत्पन्न मिळेल असे पीक आपण आधी घेऊ असे दोघांनी नक्की केले. यानुसार त्यांनी कलिंगड ची निवड केली आणि निरस व मुरमाड क्षेत्र त्यांनी यासाठी निवडले.
वाट्यावर घेतलेल्या 35 गुंठे शेत जमिनीत सर्वप्रथम नागरणी केली आणि रोटर मारला. त्यानंतर बेड तयार केलेत आणि ड्रीप अंथरूण मल्चिंग पेपर टाकला. यानंतर त्यांनी शुगर फॅक्टरी नावाचे कलिंगड वाण आणि रोपांची लागवड केली.
लागवड केल्यानंतर काही रोपे खराब झालेत मात्र त्यांनी जिद्दीने जी रोपे वाचलीत त्यांचे संगोपन केले. विशेष म्हणजे त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या घरच्यांना दिलेली नाही. स्वतः एक लाख साठ हजार रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी 35 गुंठ्यात कलिंगडची लागवड केलेली आहे.
दरम्यान या दोन जिगरबाज मित्रांनी बहु कष्टाने पिकवलेले कलिंगडचे पीक आता हार्वेस्टिंग साठी रेडी झाले असून सध्या बाजारात 13 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. दरम्यान त्यांना या 35 गुंठ्यातून ईस्टर्न एवढे उत्पादन मिळण्याची आशा असून यातून त्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची कमाई होणार आहे.
विशेष म्हणजे ही तोडबटाईची शेती करताना त्यांनी मजुरांचा वापर केलेला नाही आणि कॉलेजला देखील त्यांनी दांडी मारलेली नाही. यामुळे शेतकरी पुत्रांमध्ये कष्ट करण्याची धम्मक असते आणि हीच धम्मक या दोघा मित्रांसाठी फायदेशीर ठरली असून आज त्यांनी कलिंगड लागवडीतून लाखो रुपये कमावले आहेत.