Watermelon Farming : शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्हीही रब्बी पिकाची काढणी पूर्ण केली असेल अन आगामी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी एखादे पिक घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची ठरणार आहे.
खरे तर उन्हाळी हंगामात टरबूज म्हणजेच कलिंगड पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. टरबूज पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. अवघ्या काही दिवसांच्या शेतीमधून शेतकऱ्यांना यातून चांगले उत्पन्न मिळते.
कलिंगड लागवडीचा विचार केला असता देशभरातील अनेक राज्यांमध्ये कलिंगडची लागवड होते. आपल्या महाराष्ट्रात देखील कलिंगडची मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. उन्हाळ्यात याला बाजारात मोठी मागणी असते.
तुम्ही जर आता बाजारात गेला तर तुम्हाला कलिंगड 100 आणि 101 टक्के पाहायला मिळणार आहे. उन्हाळ्यात कलिंगड हे मोठ्या प्रमाणात मागणी मध्ये असणारे फळ आहे. बाजारात उन्हाळ्यामध्ये याला चांगला भावही मिळतो.
अशा परिस्थितीत जर उन्हाळी हंगामात कमी दिवसात तुम्हाला चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर याची लागवड फायदेशीर ठरणार आहे. तथापि याच्या शेतीमधून जर तुम्हाला विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर कृषी तज्ञांनी याच्या काही सुधारित वाणांची लागवड करण्याचा सल्ला दिलेला आहे.
जर शेतकरी बांधवांनी या सुधारित जातींची लागवड केली तर त्यांना निश्चितच उन्हाळी हंगामात या पिकातून चांगले विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन या ठिकाणी मिळवता येणे शक्य होणार आहे.
यामुळे अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्यांना लाखो रुपयांची कमाई करता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात त्यांचं जातींचे बियाणे लावले पाहिजे जे गेल्या वर्षी बाजारात चांगल्या मागणीत होते.
ज्या वाणाच्या कलिंगड पिकातून शेतकऱ्यांना गेल्यावर्षी चांगले उत्पादन आणि कमाई झाली असेल त्याच वाणाची लागवड शेतकऱ्यांनी यंदा सुद्धा केली पाहिजे. शेतकरी बांधव शुगर बेबी, अर्का ज्योती, अर्का मानक इत्यादी जातीच्या कलिंगडच्या रोपांची लागवड करू शकतात.
याशिवाय, टरबूजच्या विजय शंकर जातीचे हायब्रीड बियाणेही बाजारात उपलब्ध आहे. हे देखील बियाणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. तथापि शेतकऱ्यांनी कोणत्याही जातीची निवड करण्यापूर्वी कृषी तज्ञांचा आणि कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घ्यावा.
कारण की, शेतकरी बांधवांनी त्यांच्या जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि हवामानाप्रमाणे कलिंगड पिकाच्या जातीची निवड करणे या ठिकाणी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.