Wardha to Nanded Railway : विदर्भातील वर्धा आणि मराठवाड्यातील नांदेड या दोन शहरादरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. या पार्श्वभूमीवर वर्धा ते नांदेड हा प्रवास जलद करण्यासाठी भारतीय रेल्वे कडून वर्धा-नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जात आहे.
आता याच रेल्वेमार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होणार आहे. पार्श्वभूमीवर खासदार रामदास तडस यांनी नुकतीच या मार्गाची पाहणी देखील केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या रेल्वे मार्गाचे दोन टप्प्यात काम केले जात आहे.
पहिल्या टप्प्यात वर्धा ते यवतमाळ पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ ते नांदेड पर्यंत काम होणार आहे. यामध्ये वर्धा ते यवतमाळ या टप्प्याचे अंतर 78 किलोमीटर असून दुसऱ्या टप्प्याचे अंतर 206 किलोमीटर आहे.
वर्धा येथील देवळी ते यवतमाळ येथील कळंब पहिल्या टप्प्याचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर अखेर या पहिल्या टप्प्याचे पूर्ण काम होणार आहे. वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे अंतर जवळपास 40 किलोमीटर आहे.
या मार्गावरील देवळी रेल्वे स्थानकाचे काम देखील आता पूर्णत्वाकडे चालले आहे. यामुळे डिसेंबर मध्ये या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असून जानेवारी महिन्यात या मार्गावर रेल्वे धावेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या रेल्वे मार्गाचे उद्घाटन दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्याचे नियोजन असल्याची माहिती खासदार तडस यांनी यावेळी दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वेसेवेने वर्धा ते नांदेड हा प्रवास केल्यास जवळपास साडेदहा तासांचा कालावधी प्रवाशांना खर्च करावा लागतो.
हे पण वाचा :- मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची नापसंती; ‘या’ कारणामुळे मात्र दोन महिन्यात प्रवासी संख्या झाली कमी, वाचा….
मात्र या नवीन वर्धा-नांदेड रेल्वे मार्गामुळे हा प्रवास केवळ चार तासात पूर्ण होणार असल्याचा दावा रेल्वेच्या माध्यमातून केला जात आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. वास्तविक रेल्वे मार्ग प्रकल्प 2009 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता.
मात्र याचे प्रत्यक्षात काम 2016 मध्ये सुरू झाले आहे. आता डिसेंबर 2023 अखेर या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असून जानेवारी 2024 मध्ये या रेल्वे मार्गावर प्रथमतः रेल्वे धावणार आहे यामुळे निश्चितच वर्धा ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! पुण्याच्या युवा शेतकऱ्यांनी सफरचंद शेती यशस्वी करून दाखवली, कोणत्या जातीच्या रोपांची केली लागवड, पहा….