Virar Alibag Corridor : विरार अलिबाग कॉरिडोर बाबत तब्बल तेरा वर्षानंतर एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर आली आहे. खरं पाहता या कॉरिडोरची योजना 2011 साली बनवण्यात आली. त्यावेळी ही योजना एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवण्याचा प्लॅन होता.
त्यानंतर मात्र या कॉरिडोरच्या बाबतीत अपेक्षित अशी डेव्हलपमेंट पाहायला मिळाली नाही. त्यानंतर 2020 मध्ये ही योजना एम एस आर डी सी अर्थातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे एका कराराच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आली.
मात्र, 2012 मध्ये या कॉरिडॉर साठी भूसंपादनाची जी रक्कम भविष्य 15 कोटी रुपयांच्या घरात जात होती ती रक्कम 2023 मध्ये जवळपास दहापट वाढ होऊन 21 ते 22 हजार कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. वास्तविक पाहता 2012 मध्ये या संपूर्ण कॉरिडॉर प्रकल्पासाठी 12554 कोटी एवढा खर्च येणार होता.
मात्र आता या प्रकल्पाचा एकूण खर्च हा 60,564 कोटी रुपयाच्या आसपास राहणार आहे. परंतु या कॉरीडोरच्या बाबतीत आता एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कॉरिडोरच्या कामासाठी आता कंबर कसली आहे. या प्रकल्पासाठी लागणारे निधीची उभारणी आता महामंडळाकडून करण्यास सुरुवात झाली आहे.
आता या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार असून टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगराच्या वैभवात मोठे भर पडणार असून यामुळे दळणवळण व्यवस्था अधिकच मजबूत होणार आहे. दरम्यान येत्या सहा महिन्यात या कॉरिडॉरचा मोरबे ते करंजाडे या टप्प्याचे काम सुरु करण्याच टारगेट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आखले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मोरबे ते करंजाडे यादरम्यान एकूण 20 किलोमीटरचा हा कॉरिडोर राहणार आहे. विरार ते अलिबाग हा संपूर्ण कॉरिडॉर एकूण 127 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आला आहे. हा मार्ग भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण, अलिबाग या भागातून जाणार आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता जेएनपीटी बंदर, नवी मुंबई विमानतळ तसेच शिवडी नावा ट्रान्स हार्बर लिंकला जोडण्याचे प्रस्तावित आहे. निश्चितच हा कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरांसाठी अति महत्त्वाचा आणि महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या महामार्गाची अर्थातच कॉरिडोरची सर्वात मोठे विशेषता म्हणजे हा कॉरिडॉर एकूण 16 लेनचा राहणार आहे.
विशेष म्हणजे यामध्ये दोन लेन या केवळ बस आणि ॲम्बुलन्ससाठी राखीव राहणार आहेत. आणि आपणास सांगू इच्छितो की हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग क्र. 8, 3, 4, 4 – B, 17 भिवंडी बायपास व मुंबई – पुणे एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस – वे मार्गालाही हा कॉरिडोर जोडला जाणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ग्रीनफिल्ड कॉरिडोरमध्ये एकूण 48 भुयारी मार्ग राहणार आहेत. तसेच 41 पूल देखील या कॉरिडोरवर उभारली जाणार आहेत. निश्चितच हा कॉरिडॉर मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अति महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे कुठे ना कुठे मुंबईच्या उपनगरात होणारी वाहतूक कोंडी सुटणार असून यामुळे उपनगरांमधील प्रवास अजूनच सोयीस्कर होणार आहे.