Village Business Idea: भारत हा एक कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे, जिथे बहुतांश लोकसंख्या त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर (Farming) अवलंबून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवण्यात शेतकऱ्यांची (Farmer) महत्त्वाची भूमिका आहे.
त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना योजनांशी जोडले जाते. जेणेकरून खर्चाचा बोजा कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून नानाविध अडचणीमुळे शेती व्यवसायात (Agriculture) नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकरी बांधव शेतीपासून दूर राहत असल्याचे चित्र आहे. आता शेती व्यवसायात तोटा सहन करावा लागत असल्याने खेड्यांमधून शहरांकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
गावाकडून होत असलेल्या सततच्या स्थलांतरामुळे शेतीवर वाईट परिणाम झाला आहे. मात्र जर शेतकऱ्यांना त्यांच्या शेताशी आणि गावाशी जुडून राहून लाखोंचा नफा कमवायचा असेल, तर शेतीसोबतच अनेक प्रकारचे शेती व्यवसाय (agri business) केले जाऊ शकतात. आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी शेतीशी संबंधित आणि गावात राहून सुरू करता येणाऱ्या व्यवसायाविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या शेतीपूरक व्यवसाय विषयी सविस्तर.
वर्मी कंपोस्ट युनिट (Vermicompost Farming)
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर सुरू झाला आहे. यामुळे आता शेतजमीन धोक्यात आली आहे. जमिनीची सुपीकता लक्षणीय कमी होत चालली असून आता उत्पादनात देखील घट होत आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी आता रासायनिक शेती ऐवजी सेंद्रीय शेतीला प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे. रसायनांनी नष्ट होणारी माती वाचवण्यासाठी सेंद्रिय शेतीला सातत्याने प्रोत्साहन देखील दिले जात आहे. परंतु सेंद्रिय खताच्या अभावामुळे अनेक शेतकरी पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी रसायनांवर अवलंबून आहेत. गावांची, शेतकऱ्यांची आणि शेतांची ही गरज भागवण्यासाठी वर्मी कंपोस्ट युनिट उभारता येईल, ज्याच्या मदतीने शेतकरी आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच गांडूळ खताची विक्री करून लाखोंचा नफा सहज कमवू शकतात.
या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकार चांगल्या दराने कर्ज, सबसिडी आणि आर्थिक अनुदान देखील देत आहे. मित्रांनो खरे पाहता आता मायबाप शासनाकडून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात असल्याने अनेक शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत गांडूळ खताची मोठी मागणी आहे. यामुळे या व्यवसायाला भविष्यात चांगले सोन्याचे दिवस येणार आहेत.