Village Business Idea: तुम्ही खेडेगावात किंवा छोट्या शहरात राहत असाल किंवा शेतकरी (Farmer) असाल आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय (Business) करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपा आणि मागणी मध्ये असलेला व्यवसाय घेऊन आलो आहोत.
याची खास गोष्ट अशी आहे की, तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकता आणि या व्यवसायासाठी कोणताही हंगाम नाही. तुम्ही हा व्यवसाय कधीही सुरू करू शकता आणि कमी गुंतवणुकीचा व्यवसाय (Low Investment Business) सुरू करून चांगले उत्पन्न मिळवू शकता.
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला टोमॅटो सॉस व्यवसायाबद्दल (Tomato sauce business) सांगणार आहोत. या व्यवसायाची मागणी गावांपासून शहरांपर्यंत कायम आहे. प्रत्येकाच्या आहारात टोमॅटोचा समावेश असतो ही गोष्ट तुम्हा सर्वांना माहीत आहेचं. त्याशिवाय चटणीही अपूर्ण मानली जाते. याशिवाय भाज्यांपासून ते सॉस, केचप किंवा पिझ्झा, बर्गर इत्यादींसाठी याचा वापर केला जातो. वर्षातील 12 महिने बाजारात टोमॅटोला मागणी असते.
खरं पाहिलं तर टोमॅटोची किंमत (Tomato Price) साधारणपणे हंगामात खूप कमी असते, पण ऑफ सीझनमध्ये त्याची मागणी कायम राहते. अनेक प्रकारच्या फास्ट फूडमध्ये वापरल्यामुळे टोमॅटोची मागणी वर्षानुवर्षे वाढत आहे. त्याचबरोबर टोमॅटोची मागणी ग्रामीण भागापासून शहरे, छोटी शहरे आणि मेट्रो शहरांमध्ये कायम आहे. अशा परिस्थितीत, टोमॅटो सौस व्यवसाय तुम्हाला पैसे कमवण्याची चांगली संधी देतो. टोमॅटो सॉस व्यवसायातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
किती खर्च येईल
तुम्हाला टोमॅटो सॉसचा व्यवसाय करायचा असेल, तर त्याची खास गोष्ट म्हणजे तो सुरू करण्यासाठी सरकारही तुम्हाला पूर्ण मदत करते. या व्यवसायासाठी तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकता. टोमॅटो सॉसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 7.82 लाख रुपये खर्च लागणार आहे. यामध्ये तुम्हाला स्वतः 1.95 लाख रुपये गुंतवावे लागतील. बाकी पैसे मुद्रा योजनेच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊ शकता.
तुम्ही किती कमवाल
आम्ही तुम्हाला सांगतो की, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत, 7.82 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी तयार केलेल्या अंदाजानुसार वार्षिक उलाढाल 28.80 लाख रुपये असू शकते. याशिवाय वार्षिक 24.22 लाख रुपये खर्च होऊ शकतो. दुसरीकडे, या संदर्भातील उलाढालीबद्दल बोलायचे झाले तर, खर्च वजा केल्यावर तुमच्याकडे 4.58 लाख रुपये शिल्लक राहतील. हा तुमचा वार्षिक निव्वळ नफा असेल. म्हणजेच तुम्हाला दरमहा सुमारे 40,000 हजार रुपये मिळतील.