Versova Virar Sea Link : मुंबईमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते विकासाची कामे सुसाट सुरू आहेत. शहरातील प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची जटील समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वर्सोवा ते विरार दरम्यान सीलिंक बांधला जाणार आहे. यामुळे वर्सोवा ते विरार दरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे. अशातच आता या संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार आता या सीलिंकचा विस्तार पालघर पर्यंत केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा सीलिंक पालघर पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने सविस्तर अभ्यास करणार आहे. यानंतर याबाबत योग्य तो अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. निश्चितच हा सीलिंक जर पालकर पर्यंत विस्तार लागेल तर याचा फायदा होणार आहे.
पालघर वासियांना याचा सर्वाधिक फायदा होईल आणि वर्सोवा ते पालघर दरम्यानचा प्रवास सोयीस्कर होईल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की वर्सोवा ते विरार हा सीलिंक राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला होता. मात्र नंतर हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे देण्यात आला.
दरम्यान आता प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असून पालघर पर्यंत प्रवेश-नियंत्रित सी लिंक तयार करण्याची योजना आखली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे. वर्सोवा ते विरार सी लिंक बाबत MMRDA अधिकार्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, हा प्रस्तावित सीलिंक संबंधित भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करणार आहे. यामुळे प्रवाशांना सिग्नल-मुक्त प्रवास करता येणे शक्य बनणार आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; 12 एप्रिलला ‘या’ रूटवर सुरु होणार आणखी एक Vande Bharat Train, पहा…..
हा सीलिंक कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर आणि विरार अलिबाग कॉरिडॉरला रिंग रोड कनेक्टर म्हणून काम करणार आहे. वास्तविक या सीलिंक प्रोजेक्टला आधी 32 हजार कोटी रुपये खर्च होईल असा दावा केला जात होता मात्र आता यामध्ये आठ हजार कोटींची वाढ झाली असून आता चाळीस हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
एकंदरीत प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे मात्र हा प्रकल्प मुंबईच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. सोबतच या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे नियोजन एमएमआरडीएच्या माध्यमातून आखल जात आहे यामुळे याला अजून महत्त्व प्राप्त होणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह 21 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ! आयएमडीचा अलर्ट