Vegetable Farming : तुम्हीही शेतकरी आहात ना ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. आजची ही बातमी जे शेतकरी बांधव भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात त्यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. बारा महिने भाजीपाला पीक उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज आपण एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण कोणत्या महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड केली पाहिजे याविषयी कृषी तज्ञांनी दिलेली मोठी माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर पारंपारिक पिकांसोबतच आपल्या महाराष्ट्रात तरकारी अर्थातच भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भाजीपाला पिकांची लागवड बारा महिने केली जाऊ शकते. विविध भाजीपाला पिकांची आपल्याकडे शेती होत असते.
मात्र कोणत्या महिन्यात कोणत्या भाजीपाल्याची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल ? याच संदर्भात कृषी तज्ञांनी सांगितलेली माहिती आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहितीविषयी सविस्तर.
मार्च महिन्यात कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी ?
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या चालू महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात शेतकरी बांधव गवार, काकडी, चवळी, करडई, भोपळा, खरबूज, टरबूज, पालक, भेंडी, याची लागवड करू शकतात.
एप्रिल महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकाची शेती केली तर मिळणार दर्जेदार उत्पादन ?
पुढील महिन्यात अर्थातच एप्रिल महिन्यात राजगिरा आणि मुळा या भाजीपाला पिकांची शेतकरी बांधव लागवड करू शकतात. पुढल्या महिन्यात जर या दोन पिकांची लागवड केली तर चांगले विक्रमी उत्पादन मिळेल अशी माहिती कृषी तज्ञांनी यावेळी दिली अशी.
मे महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करावी?
मे महिन्यात शेतकऱ्यांनी फुलकोबी, वांगी, कांदा, मुळा, मिरची या भाजीपाला पिकांची लागवड केली पाहिजे असे मत कृषी तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केले आहे. याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते, असा विश्वास कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे.
जून महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड करावी ?
जून महिना हा मान्सूनचा पहिला महिना असतो. या महिन्यात आपल्या राज्यात सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्य पिकांची पेरणी केली जाते. या महिन्यापासून खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
पण, शेतकरी बांधव सोयाबीन आणि कापूस या मुख्य पिकांसमवेतच अनेक भाजीपाला पिकांची देखील जूनमध्ये लागवड करतात.
फुलकोबी, काकडी, चवळी, करडई, भोपळा,बीन, भेंडी, टोमॅटो, कांदा, काकडी, इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड जून महिन्यात केली जाऊ शकते अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी यावेळी दिली आहे.