Vegetable Farming: भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात आता मोठा बदल केला जात आहे. पारंपारिक पद्धतीने फाटा देत आता शेतकरी बांधव आधुनिक पद्धतीने शेती (Agriculture) करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) आता शेतीमध्ये चांगला फायदा होत आहे.
शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाल्याने शेतकरी बांधवांचे उत्पादन खर्चात बचत होत आहे आणि उत्पन्नात (Farmer Income) भरीव वाढ होत आहे. मित्रांनो शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात आधुनिक पद्धतीने भाजीपाल्याची शेती करत असल्याचे चित्र आहे.
भाजीपाला पिकांची शेती (Vegetable crop) शेतकरी बांधवांना कमी खर्चात आणि कमी दिवसात उत्पन्न मिळवून देत असल्याने या भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीकडे शेतकरी बांधव आता आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो मंडप पद्धतीने जर भाजीपाला पिकांची लागवड केली तर निश्चितच शेतकरी बांधवांना फायदा होतो. मंडप पद्धत हे देखील भाजीपाला शेती साठी एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून विकसित होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण मंडप पद्धतीने कशा प्रकारे भाजीपाला पिकांची शेती केली जाते याविषयी जाणून घेणार आहोत.
जाणकार लोकांच्या मते, वेलवर्गीय भाजीपाला पीक मंडप पद्धतीने पिकवल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. या तंत्राने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना बांबू किंवा तारांची जाळी तयार करून भाजीचा वेल जमिनीच्या वर आणावा लागतो. कारले, करवंद, काकडी, सोयाबीन अशी पिके या मंडप पद्धतीने घेता येत असल्याचे सांगितले जाते.
मंडप पद्धतीने भाजीपाला शेती करण्याचे फायदे नेमके कोणते बर…!
पावसाळ्यात मंडप पद्धतीने शेती केल्यास पिकाचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. मंडप पद्धतीने भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केल्यास पिकात रोग आणि आजार होण्याची शक्यता कमी होते. पिकात काही रोग आढळल्यास औषध फवारणी करणे सोपे जाते.फळ दिसायला अतिशय आकर्षक व उत्पादन देखील चांगले मिळते. त्यामुळे त्यांची किंमत बाजारात चांगली राहते. या सर्वांशिवाय इतर पद्धतींनी भाजीपाला लागवडीपेक्षा उत्पन्नही जास्त मिळते.
3G कटिंग पद्धत म्हणजे काय
या तंत्रज्ञानामध्ये, मुख्य फांदीमध्ये 20-25 पाने दिसू लागल्यावर वरचा भाग कापून टाकला जातो. ज्यातून दोन फांद्या निघतात. त्यांना पुन्हा 20-25 पाने आल्यावर ते पुन्हा कापतात. त्यात आणखी फांद्या निघतात. या सर्व फांद्यांमधून फळे येतात. या शाखांना 3G शाखा म्हणतात.
या तंत्रज्ञानामुळे नफा वाढेल
शेतकऱ्यांनी थ्रीजी कटिंग पद्धतीने शेती केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. मुख्य फांदीला बहुधा नर फुले येतात आणि दुय्यम फांदीवर मादी फुले येतात. त्यामुळे फळांची संख्या वाढते. याचा अर्थ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्याचवेळी नफाही दुप्पट होईल.